लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

१४ नोव्हेंबरला लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव; लोकसेवक युवराज दाखले यांची समाजबांधवांना साद

काशिनाथ शिंदे

पुणे : आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील संगमवाडी येथील लहुजी शक्तीपीठावर भव्य जयंती महोत्सव आणि ऐतिहासिक महाएकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोंच्या संख्येने मातंग समाजबांधव, बहुजन समाज आणि शिवशाहीप्रेमींनी उपस्थित राहावे, असे जाहीर आवाहन अखिल भारतीय हिंदू मातंग संघ व शिवशाही शासन पक्षाचे संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज भगवान दाखले यांनी केले आहे.

लहुजी वस्ताद साळवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळ्यांची परंपरा पुढे नेण्याबरोबरच महात्मा फुले, वासुदेव बळवंत फडके आणि उमाजी नाईक यांसारख्या क्रांतिकारकांना शस्त्रविद्येचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या शौर्याचा, त्यागाचा आणि क्रांतिकारी विचारांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हा या जयंती महोत्सवामागील प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ जयंती उत्सव नसून समाजाच्या एकजुटीचा आणि स्वाभिमानाचा हुंकार ठरणार आहे.

लोकसेवक युवराज दाखले म्हणाले, “१४ नोव्हेंबर हा दिवस आमच्यासाठी दिवाळी-दसऱ्यापेक्षाही मोठा आहे. लहुजी वस्तादांच्या शक्तीपीठावर नतमस्तक होण्यासाठी प्रत्येक मातंग बांधवाने, युवकांनी, माता-भगिनींनी लाखोंच्या संख्येने संगमवाडीत यावे. आपली एकजूट आणि ताकद दाखवून द्यावी. ही केवळ गर्दी नसून आपल्या समाजाच्या एकतेचे सामर्थ्य आहे. चलो संगमवाडी!”

दरम्यान, संगमवाडी येथे आयोजित नियोजन बैठकीस शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उषामाई कांबळे, आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सदस्य भास्कर नेटके, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अडागळे, संदिपान झोंबाडे, संस्थापक प्रमुख लोकसेवक युवराज दाखले, स्मारक समितीचे सचिव विकास सातारकर, शंकर तडाखे, लहुजी शासन संघटनेचे सन्नी नाडर, माजी नगरसेवक शांतीलाल मिसाळ, भगवान वैरागकर, डॉ. अण्णा भाऊ प्रबोधन पर्वाचे माजी अध्यक्ष संजय भिसे, नवनियुक्त प्रबोधन पर्व अध्यक्ष नानासाहेब कांबळे, सचिन भिसे, गणेश कलवले, शिवाजी खडसे, शिवशाही माथाडी कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन दोनगहू, पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष उत्तम सकटे, अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हर्षद भाई खान, अशोक ढवारे, सचिन येडके, सतीश वेळेवर, संगिता भिसे, शालन लोंढे, कविता कसबे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

See also  खाकी वर्दीचा सन्मान राखत कर्तव्य बजावले; चार पोलीस अधिकारी सेवेतून निवृत्त!

या जयंती महोत्सवाला राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

निमंत्रक : शिवशाही शासन पक्ष व अखिल भारतीय हिंदू मातंग संघ

प्रमुख उपस्थिती : कृष्णा दादा साबळे, सचिन भाऊ दुनघव, उषामाई कांबळे तसेच सर्व प्रदेश, जिल्हा व तालुका कार्यकारिणी.

चलो संगमवाडी! जय लहुजी! जय शिवराय!

  • Related Posts

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून कामगारांना भरघोस भेट; काहींना एका महिन्याच्या वेतनाएवढा बोनस काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचाकण : राज्यातील ग्रामीण भागात दुष्काळाचे सावट असताना चाकण औद्योगिक वसाहतीतील कामगारांसाठी…

    न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

    पोलिस आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी कारवाई; दंड न भरल्यास एक महिन्याचा साधा कारावास काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण करणे, शांततेचा भंग…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

    न्यायालयात गोंधळ घालणे भोवले! नऊ जण दोषी; प्रत्येकी एक हजारांचा दंड

    पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर

    पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर

    सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

    सरदार पटेल जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये एकता दौड; ‘सरदार प्रबोधन पर्वा’चा उत्साहात प्रारंभ!

    महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!

    महामार्गाच्या कामात महावितरणच्या वीजवाहिन्यांना धोका; NHAI च्या कामावर आक्षेप!