दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!

दोन हजारांच्या तिकीट बुकिंगवर मिळणार लकी ड्रॉ कुपन; टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसह १०० हून अधिक आकर्षक बक्षिसांची मेजवानी

काशिनाथ शिंदे

पिंपरी-चिंचवड : दिवाळी सणानिमित्त गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड (पुणे जिल्हा) यांच्या वतीने भव्य दिवाळी बंपर लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. प्रवाशांचा ट्रॅव्हल्स व्यवसायावरील विश्वास अधिक दृढ करण्यासोबतच त्यांना दिवाळीची खास भेट देण्याच्या उद्देशाने ही अनोखी योजना राबविण्यात येत आहे.

दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक आपल्या गावी जाण्यासाठी खासगी बससेवेचा पर्याय निवडतात. या पार्श्वभूमीवर असोसिएशनने प्रवाशांसाठी आकर्षक बक्षिसांची संधी उपलब्ध करून दिली आहे. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांपर्यंतचे तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला एक लकी ड्रॉ कुपन देण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक दोन हजार रुपयांच्या बुकिंगमागे एक अतिरिक्त कुपन दिले जाणार आहे.

या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस ४० इंची टीव्ही, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस फ्रिज, तृतीय क्रमांकाचे बक्षीस वॉशिंग मशीन, चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस वॉटर प्युरिफायर, तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस एअर फ्रायर असेल. याशिवाय ५० बाथरूम सेट, २५ इस्तरी आणि २५ भिंतीवरील घड्याळे अशी अन्य १०० आकर्षक बक्षिसेही प्रवाशांना जिंकता येणार आहेत.

या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यासाठी २७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत तिकीट बुकिंग करता येणार आहे. रविवार, २९ नोव्हेंबर २०२६ रोजी लकी ड्रॉ सोडत काढण्यात येणार आहे.

ऑनलाइन बुकिंगमधील फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन

दरम्यान, ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. ऑनलाइन बुकिंगमध्ये दाखवलेला दर आणि प्रत्यक्ष बुकिंगच्या वेळी आकारला जाणारा दर यात तफावत असणे, सवलतींच्या नावाखाली जादा पैसे आकारणे, ऐनवेळी बससेवा रद्द होणे, पैसे परत न मिळणे तसेच निश्चित पिकअप पॉइंट नसल्याने प्रवाशांची गैरसोय होणे, अशा समस्यांकडे असोसिएशनने लक्ष वेधले आहे.

See also  पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे

याउलट, मान्यताप्राप्त ट्रॅव्हल्स एजंटच्या कार्यालयातून तिकीट बुक केल्यास बस रद्द झाल्यास पर्यायी बसमध्ये आसन उपलब्ध करून देणे किंवा नियमानुसार पैसे परत मिळवून देण्यासाठी एजंट आणि बसचालकांकडून सहकार्य केले जाते. प्रवासादरम्यानही प्रवाशांना आवश्यक मदत मिळू शकते.

त्यामुळे नागरिकांनी दिवाळीमध्ये गावी जाताना पिंपरी-चिंचवड शहरातील ट्रॅव्हल्स असोसिएशनच्या अधिकृत आणि मान्यताप्राप्त एजंट कार्यालयांतूनच तिकीट बुक करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“प्रवाशांनी आमच्या व्यवसायावर दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. दिवाळीच्या आनंदात प्रवाशांना सहभागी करून घेण्याची संधी असोसिएशनला द्यावी आणि अधिकृत एजंट कार्यालयांतूनच तिकीट बुक करून या बंपर लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हावे,” असे आवाहन ट्रॅव्हल्स असोसिएशन पिंपरी-चिंचवड शहराचे सचिव बाळा दानवले यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    सणासुदीच्या काळात ऑनलाइन फसवणुकीचा धोका; ओटीपी, बँकिंग माहिती आणि अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे आवाहन काशिनाथ  शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : दिवाळीचा सण आनंदात आणि उत्साहात साजरा…

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी; पर्यावरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे / भीमाशंकर : भीमाशंकर परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!

    दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती

    फिडेल सॉफ्टटेककडून सॉफ्टेंजरचे अधिग्रहण; जागतिक विस्ताराला मिळणार नवी गती

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    लहुजी वस्ताद जयंतीनिमित्त संगमवाडीत लाखोंच्या महाएकत्रीकरणाचे आवाहन!

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर

    चाकण एमआयडीसीतील कामगारांची दिवाळी गोड! ५५ हजारांपर्यंत बोनस जाहीर