पीबीएसच्या विद्यार्थ्यांनी देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे

डॉ. गणेश राव; पुणे बिझनेस स्कूलमध्ये प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे कॉर्पोरेट क्षेत्रासाठी सक्षम नेतृत्व घडविण्याच्या दृष्टीने पुणे बिझनेस स्कूलचा दोन वर्षांचा व्यवस्थापन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा आहे. उच्च शिक्षणासोबतच नेतृत्वगुण, व्यावसायिक सक्षमता, नावीन्यपूर्ण विचार आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन येथे विकसित केला जातो. विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत आपले करिअर घडवावे आणि देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे मार्गदर्शन पुणे बिझनेस स्कूलचे संचालक व प्राचार्य डॉ. गणेश राव यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पुणे बिझनेस स्कूलमध्ये प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी पीबीएसच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी त्यागी, मास्टरकार्डचे मध्यपूर्व, आफ्रिका आणि युरोप संचालक हेमंत शर्मा, इंडिया डिजिटल ॲग्रीकल्चर कौन्सिलचे अध्यक्ष दुष्यंत त्यागी, संचेती हेल्थकेअर ॲकॅडमीच्या मानव संसाधन प्रमुख अजंता डे, बायरच्या जागतिक खरेदी व्यवस्थापक सीमा मोहंती, केपीआयटीचे संचालक मृणाल मजुमदार, नाऊ यू सीड इंडिया प्रा. लि.चे विपणन उपाध्यक्ष संदीप कुलकर्णी, व्हर्लपूल इंडियाचे उपव्यवस्थापक दिनेश शिंदे, टाटा मोटर्सच्या उपमहाव्यवस्थापक अर्चना सराफ, झायडस बायोलॉजिक्सचे शिक्षण व विकास प्रमुख विवेक शर्मा आणि फर्टिओनिक्स सोल्युशन्स एलएलपीचे संचालक जितेंद्र कोळपे आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. मीनाक्षी त्यागी म्हणाल्या की, पीबीएसमध्ये प्रवेश घेणे म्हणजे उद्योगक्षेत्रासाठी व्यवस्थापकीय क्षमता, नैतिक मूल्ये आणि समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्याची वचनबद्धता असलेले आत्मविश्वासपूर्ण नेतृत्व घडविण्याच्या प्रवासाची सुरुवात आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि औद्योगिक भेटी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नावीन्य व व्यावसायिक उत्कृष्टतेवर आधारित शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. कॉर्पोरेट जगताच्या अपेक्षा समजून घेत नेतृत्व, करिअर विकास आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार केले जाते, असे त्यांनी सांगितले.

See also  ‘धरित्रीच्या लेकी’मधून मराठी गीतांतील स्त्रीभावनेचा सुरेल जागर

यावेळी विविध क्षेत्रांतील कॉर्पोरेट प्रतिनिधींनी ‘नेतृत्वाची जबाबदारी आणि विविध क्षेत्रांतील उदयोन्मुख संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्योगक्षेत्रातील बदल, कौशल्यविकास, नेतृत्वगुण आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर