वास्तुशास्त्र म्हणजे सर्जनशीलता आणि भावना यांचे प्रतीक

— ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी

एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये पदवीप्रदान सोहळा उत्साहात

काशिनाथ शिंदे

पिंपरी : वास्तुशास्त्र म्हणजे संवेदनशीलता, सर्जनशीलता आणि भावनांचे एकत्रीकरण करून उभारलेल्या वास्तूचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरून न जाता त्याचा धैर्याने सामना करावा. आपल्या कामाप्रती श्रद्धा, सबुरी आणि साधना या मूल्यांचा जीवनात अंगीकार केल्यास यशासोबतच आनंदही अनुभवता येतो, असे मार्गदर्शन ज्येष्ठ वास्तुविशारद गिरीश दोशी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन येथे वास्तुविशारद पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा पदवीप्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर्किटेक्ट गौरव भांगरे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी, परीक्षा अधिकारी अजय हराळे, अंतर्गत वरिष्ठ पर्यवेक्षक रुजूता पाठक, पदवीप्राप्त विद्यार्थी, पालक प्रतिनिधी, प्राध्यापक तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.

गिरीश दोशी यांनी गेल्या चार दशकांतील आपल्या वास्तुशास्त्रीय प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. विविध ठिकाणी केलेल्या व्यावसायिक कार्याची दुर्मिळ छायाचित्रे दाखवत त्यांनी वास्तुशास्त्रातील बदलांचा आढावा घेतला. एखादी कलाकृती किंवा वास्तू उभारताना अवकाश, सूर्यप्रकाश, उद्यान आणि रचनात्मक सौंदर्य यांचा समतोल विचार करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच फेरो सिमेंटसारख्या नव्या तंत्रज्ञानामुळे वास्तुविशारदांच्या क्षेत्राला अधिक वैविध्य प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आर्किटेक्ट गौरव भांगरे म्हणाले की, उत्तम वास्तुविशारद होण्यासाठी साधना, संयम आणि सातत्य या मूल्यांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. पदवी प्राप्त केल्यानंतर किमान तीन वर्षे एखाद्या अनुभवी वास्तुविशारदाच्या मार्गदर्शनाखाली काम करावे. त्यांच्या अनुभवातून अनेक गोष्टी शिकता येतात. गुरुचे मार्गदर्शन सोबत असेल तर औपचारिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही शिकण्याची प्रक्रिया सुरूच राहते. प्रत्यक्ष काम करताना ग्राहक, गवंडी आणि इतर संबंधित व्यक्तींची मानसिकता समजून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

See also  अमृतम मारीमुत्तू यांचे अल्पशा आजाराने निधन

कार्यक्रमाच्या आयोजनात लक्ष्मण तोरगळे, किसन काळे, प्राध्यापक आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. शिवा शिशोविया यांनी केले, तर आभार प्रा. दक्षा देशमुख यांनी मानले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर