देहूरोड येथील गांधीनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या अमृतम हाजी मलंग मारीमुत्तू (वय ५१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अमृतम मारीमुत्तू या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक तसेच काँग्रेस पक्षाचे दक्षिण पुणे जिल्हा उपाध्यक्ष हाजी मलंग मारीमुत्तू यांच्या पत्नी होत. तसेच देहूरोड ब्लॉक काँग्रेसचे शहराध्यक्ष चंद्रशेखर माळी यांच्या त्या भावजय होत.
सामाजिक कार्यात त्या सक्रिय होत्या. त्यांच्या पश्चात पती, सासरे, एक मुलगा, तीन मुली आणि दीर असा परिवार आहे.







