काशिनाथ शिंदे : चिंचवड
पिंपरी-चिंचवड : चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अधिकारी व अंमलदारांच्या गुणवत्तापूर्ण, उल्लेखनीय आणि विशेष सेवेला शासनाकडून गौरविण्यात आले आहे. राष्ट्रपती पदक, अतिउत्कृष्ट सेवापदक, उत्कृष्ट सेवापदक आणि विशेष सेवा पदक जाहीर झाले असून, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड आणि पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांच्यासह अधिकारी व अंमलदारांचा या सन्मानात समावेश आहे.
दीर्घकाळ गुणवत्तापूर्ण आणि उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी हा विशेष सन्मान करण्यात आला आहे.
अतिउत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, सपोआ विठ्ठल कुंबडे, पोलीस निरीक्षक नितीन गिते, अनिल विभुते, अरविंद पवार, गोरखनाथ कुंभार, पोलीस उपनिरीक्षक शिवानंद स्वामी, सपोफौ नागेश माळी, राजेंद्र शिंदे, सुनील कानगुडे, राजू जाधव, आदिनाथ मिसाळ आणि पोलीस हवालदार रामदास बारटक्के यांची निवड झाली आहे.
उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सुहास आवाड, रविकिरण नाळे, सचिन शिर्के, सपोनि सचिन घाटे, सपोफौ दीपक महाजन, राजेंद्र कोनेरी, पोलीस हवालदार विवेक जगदाळे, अनिल साळुंखे, अमोल निघोट, संतोष शिंदे, आशिष बोटके, कामिनी पवळे आणि मपोशि नुतन जाधरी यांचा सन्मान करण्यात आला आहे.
तर विशेष सेवा पदकासाठी पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम, पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, गणेश आठवे, दत्तात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, प्रकाश पारखे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टाफे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि चिरंजीव दलालवाड यांची निवड झाली आहे.
पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांनी कर्तव्य बजावताना दाखविलेल्या निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय सेवेची दखल घेत हा गौरव जाहीर करण्यात आल्याने चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.







