‘धरित्रीच्या लेकी’मधून मराठी गीतांतील स्त्रीभावनेचा सुरेल जागर

अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सुरेल कार्यक्रम; रसिक मंत्रमुग्ध

काशिनाथ  शिंदे

पिंपरी : अभिजात मराठी भाषेचा जागर घडविण्यासह मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ विविध सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली दि. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित या सप्ताहांतर्गत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ‘धरित्रीच्या लेकी’ हा सुरेल संगीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.

गायक धनंजय म्हसकर, अमोल बावडेकर तसेच गायिका योगिता गोडबोले, प्रिती निमकर आणि अनघा पेंडसे यांच्या सुमधुर स्वरांनी सजलेल्या या कार्यक्रमातून मराठी गीतांमध्ये प्रतिबिंबित झालेले स्त्रीचे विविध भावविश्व रसिकांसमोर उलगडले. मातृत्व, ममत्व, प्रेम, भक्ती, कर्तृत्व, स्वाभिमान आणि आत्मभान अशा स्त्रीजीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या गीतांनी प्रेक्षागृह भारावून गेले.

कार्यक्रमाची सुरुवात शांता शेळके लिखित ‘जय शारदे वागीश्वरी’ या सरस्वती वंदनेने झाली. त्यानंतर भक्तिरस, वात्सल्य आणि स्त्रीशक्तीच्या विविध छटा व्यक्त करणाऱ्या गीतांचे सादरीकरण झाले. ‘कौसल्येचा राम बाई’ या भक्तिगीतातून भक्तिभाव, तर ‘गुणी बाळ असा जागसी का रे वाया’ या अंगाईगीतामधून मातृत्व आणि वात्सल्याचा भाव प्रभावीपणे उमटला.

संतपरंपरेतील भक्तिभाव जागविणाऱ्या ‘माझे माहेर पंढरी’ आणि ‘विठू माऊली तू’ या गीतांनी वातावरण भक्तिमय केले. मराठी भावगीतांची समृद्ध परंपरा उलगडताना ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी’, ‘लाजून हासणे अन् हासून ते पाहणे’, ‘त्याची धून झंकारली रोमारोमांत’, ‘नाविका रे वारा वाहे रे’ आणि ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ यांसारख्या गीतांनी रसिकांना जुन्या मराठी गीतविश्वाची सुरेल सफर घडवली.

See also  आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा

ग्रामीण जीवन, प्रेम आणि निसर्गाचे लोभस चित्र उभे करणाऱ्या ग. दि. माडगूळकर लिखित आणि सुधीर फडके संगीतबद्ध ‘जाळीमंदी पिकली करवंदं’ या गीताने कार्यक्रमात लोकसंगीताचा रंग भरला. तर ‘आम्ही जिजाऊंच्या मुली’ या गीतातून राजमाता जिजाऊंच्या विचारांशी जोडलेली स्त्रीशक्ती आणि आत्मभान प्रभावीपणे अधोरेखित झाले.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या अजरामर स्वरविश्वातील ‘बाई बाई, मनमोराचा कसा पिसारा फुलला’ या मोहित्यांची मंजुळा चित्रपटातील गीताने रसिकांची विशेष दाद मिळवली. या गीताचे संगीत आनंदघन यांचे आहे. तसेच शांता शेळके लिखित, लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील ‘माझे राणी, माझे मोगा’ या गीताने कोकणी भाषिक लहेजातून व्यक्त झालेला प्रेमभाव मनाला भिडवला.

सुमन कल्याणपूर यांच्या मधुर स्वरांची आठवण करून देणाऱ्या ‘केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर’ तसेच ‘नाविका रे वारा वाहे रे’ या गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. ‘नसतेसघरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो’ या गीतातून सहजीवनातील भावबंध, तर ‘गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय’ या गीतातून प्रेमभावनेचे लोभस चित्र उभे राहिले.

देवीभक्तीची परंपरा आणि स्त्रीशक्तीचा आध्यात्मिक संदर्भ अधोरेखित करणाऱ्या ‘आईचा जोगवा, जोगवा मागेन’ या पारंपरिक जोगवा रचनेने कार्यक्रमातील भक्तिरस अधिक गडद केला.

मराठी गीत-संगीताच्या विविध प्रवाहांसह स्त्रीच्या भावविश्वाचा सुरेल पट उलगडत गेलेल्या या कार्यक्रमाची सांगता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या शब्दांना स्वरबद्ध केलेल्या ‘जयोस्तुते श्रीमहन्मंगले’ या स्फूर्तिगीताने झाली. लता मंगेशकर यांच्या स्वरातील या गीताने कार्यक्रमाचा समारोप उत्स्फूर्त वातावरणात झाला.

अभिजात मराठी भाषेच्या वैभवातील साहित्य, कविता, गीत, संगीत आणि लोकपरंपरांचा परिचय नागरिकांना करून देतानाच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी व्यापक लोकसहभाग निर्माण करण्याचा प्रयत्न महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. ‘धरित्रीच्या लेकी’ या कार्यक्रमातून मराठी गीतांतील समृद्ध शब्दवैभव, सांस्कृतिक परंपरा आणि स्त्रीजीवनाच्या विविध भावछटांचा सुरेल जागर घडला.

  • Related Posts

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    वापरात नसलेल्या सुस्थितीतील वस्तू कचऱ्यात टाकण्याऐवजी गरजूंना द्या; महापालिका आणि स्वच्छ संस्थेचा संयुक्त उपक्रम काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीच्या सणानिमित्त घराघरांत होणाऱ्या साफसफाईत वापरात…

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    सायंकाळच्या वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणचा पुढाकार; आगामी उन्हाळ्यात ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा काशिनाथ शिंदे : मुंबई Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : सौरऊर्जेच्या माध्यमातून निर्माण झालेली अतिरिक्त वीज…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    दिवाळीत गरजूंना मदतीचा हात! पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला वस्तू संकलन मोहीम

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    महावितरणची ऐतिहासिक कामगिरी! बॅटरीतून १,००० मेगावॅट अवर वीजपुरवठा; देशात प्रथमच विकेंद्रित साठवणूक प्रकल्पांचा टप्पा पूर्ण

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘कौशल बोध’ क्षमता विकास मेळावा उत्साहात संपन्न

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!