‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’; ‘ईव्हीएम हटाव, मतपत्रिका आणा’च्या घोषणांनी देहूरोड दणाणले
काशिनाथ शिंदे
देहूरोड : ‘वोट चोरी’च्या आरोपांच्या निषेधार्थ तसेच मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीविरोधात महाविकास आघाडी देहूरोड शहर व मित्रपक्षांच्या वतीने सोमवारी (दि. ५) जोरदार निषेध मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक सुभाष चौक ते देहूरोड तलाठी कार्यालय या मार्गावर काढण्यात आलेल्या या मोर्चात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
‘ज्ञानेश कुमार हटाव, देश बचाव’ आणि ‘ईव्हीएम हटाव, मतपत्रिका आणा’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मुख्य निर्वाचन आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
मोर्चानंतर देहूरोड तलाठी अशोक अमोदे तसेच पोलीस उपनिरीक्षक लखनकुमार वाव्हळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मोर्चात पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, देहूरोड शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू, पुणे जिल्हा शिवसेना सल्लागार रमेश जाधव, देहूरोड शहर काँग्रेस अध्यक्ष चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे देहूरोड शहर अध्यक्ष मिक्की कोचर, शिवसेना देहूरोड शहर प्रमुख संदिप बालघरे, देहू शहर शिवसेना प्रमुख राजेंद्र मोरे, मावळ तालुका काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूरभाई शेख, देहूरोड काँग्रेसचे कार्याध्यक्ष वेंकटेश कोळी, उपाध्यक्ष शंकर टी. जयसिंग, सहसचिव बबन टोम्पे, युवा नेते वेंकटेश विश्वनाथ, विष्णू नरसप्पा, मलिक शेख, वेंकटेश मारीमुत्तू, माजी नगरसेवक अली शेख, आरपीपी अध्यक्ष अरुण जगताप आदी उपस्थित होते.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे समीर सत्तेलू, कैलास गोरवे, अलीम मुल्ला, आरिफ अत्तार, राजेश कदम, अँथोनी स्वामी, दीपक कसबे, विजय पवार, किसन सुरवसे, सोमनाथ परंडवाल, शैलाताई खंडागळे, सुनंदाताई आवळे, देवा कांबळे, गणेश सावंत, राफिक शेख, बाबासाहेब शेलार, बाळासाहेब शिंदे, मोरेश्वर घाडगे, शशिकांत सप्पागुरू, बाबासाहेब दिवसे, मेहरबान सिंग तककी, रंगान्ना राजले यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते







