जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!

मुलींच्या दोन गटांत प्रथम क्रमांक; मुलांच्या गटातही विद्यार्थ्यांची पदकांची कमाई

काशिनाथ शिंदे

पिंपरी : जिल्हास्तरीय शालेय जिम्नॅस्टिक ॲक्रोबॅटिक स्पर्धेत एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत शाळेच्या यशात मानाचा तुरा रोवला. १९ वर्षांखालील गटात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारांत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत स्पर्धेवर आपली छाप उमटवली.

निगडी येथील एलिट जिम्नॅस्टिक सेंटर येथे ही स्पर्धा पार पडली. मुलींच्या गटात कृष्णल खंडागळे (इयत्ता सहावी) आणि सावनी बडवे (इयत्ता सातवी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच मिश्र जोडीच्या प्रकारात ओम पाटील (इयत्ता दहावी) आणि ओवी निकम (इयत्ता नववी) यांनी अव्वल स्थान मिळवत सुवर्ण कामगिरी केली.

मुलांच्या गटात विश्वतेज डेरे (इयत्ता सातवी) आणि आयुष मगर (इयत्ता सहावी) यांनी, तर वेदांत देशपांडे आणि अक्षत वारके (दोघेही इयत्ता नववी) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. रुद्र जंगीरवाड आणि अमित कोडगोनोरा (दोघेही इयत्ता नववी) यांनी तृतीय क्रमांक पटकावून शाळेच्या यशात भर घातली.

या उल्लेखनीय यशाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डॉ. बिंदू सैनी, उपमुख्याध्यापक पद्मावती बंडा आणि क्रीडा शिक्षक धनाजी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

See also  शालेय खो-खो स्पर्धेला उत्साहात सुरुवात; १४८ संघांचा सहभाग
  • Related Posts

    सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!

    राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष भगवत प्रसाद मकवाना यांचे महापालिका प्रशासनाला निर्देश; जलनिस्सारण कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सफाई कर्मचाऱ्यांचे सामाजिक,…

    सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना

    महर्षी वाल्मीकी विचार प्रबोधन पर्व २०२६ उत्साहात सुरू; १९ कर्मचाऱ्यांना हक्काची घरे, १७ जणांना नियुक्तीपत्रे प्रदान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : ऊन, वारा आणि पावसाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!

    जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!

    सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!

    सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!

    सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना

    सफाई कर्मचाऱ्यांच्या मेहनतीवरच शहराच्या स्वच्छतेचा लौकिक! – भगवत प्रसाद मकवाना

    दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!

    दिवाळीत प्रवाशांसाठी ट्रॅव्हल्स असोसिएशनचा ‘बंपर लकी ड्रॉ’ धमाका!

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी

    भीमाशंकरमधील वृक्षतोडीविरोधात काँग्रेस मैदानात; टोरेंट प्रकल्प रद्द करण्याची मागणी