गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

दापोली-मंडणगड तालुक्यांसाठी तीन एसटी बसेस; प्रवाशांना पाणी, चालक-वाहकांचा सन्मान

काशिनाथ शिंदे

दापोली-मंडणगड : गणेशोत्सवानिमित्त कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी दापोली-मंडणगड सेवाभावी संस्थेच्या वतीने यंदाही सवलतीच्या दरात बससेवेचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या पुढाकारातून दापोली आणि मंडणगड या दोन्ही तालुक्यांसाठी एकूण तीन एसटी बसेस सोडण्यात आल्या. या सेवेमुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळाला.

या उपक्रमाच्या वेळी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक राजेश दळवी, सचिव जितेंद्र पवार, खजिनदार अभिषेक शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र सोंडकर, सहखजिनदार ज्ञानदेव पवार, तसेच संचालक सदस्य राजेंद्र पवार, मिलिंद दाभोळकर आणि विलास बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांसाठी संस्थेच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. तसेच संस्थेची ध्येय-उद्दिष्टे आणि सामाजिक कार्याची माहिती देणाऱ्या पत्रकांचेही वाटप करण्यात आले. या वेळी एसटी आगारप्रमुख तसेच तीनही बसेसचे चालक व वाहक यांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

प्रवाशांकडून उपक्रमाचे कौतुक

गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक कोकणात आपल्या गावी जात असतात. अशा वेळी सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिलेल्या बससेवेमुळे प्रवाशांना आर्थिक दिलासा मिळण्याबरोबरच प्रवासाची सोयही झाली. संस्थेच्या या सेवाभावी उपक्रमाबद्दल प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली.

बससेवेसाठी प्रवासी नोंदणी व नियोजनाचे काम पाहणारे संचालक सदस्य ज्ञानदेव पवार, अभिषेक शिंदे, अमोल शिंदे, प्रदीप खांबे, अजय झाटे, मिलिंद दाभोळकर तसेच नितेश चव्हाण आणि विलास बर्वे यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष तथा उद्योजक राजेश दळवी, उपाध्यक्ष तथा उद्योजक मिलिंद वराडकर आणि संचालक सदस्य तथा उद्योजक सुरज कदम यांनी मोलाचे आर्थिक व संघटनात्मक सहकार्य केले.

तसेच दोन्ही तालुक्यांच्या संपर्कप्रमुखांशी वेळोवेळी समन्वय साधून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणारे संस्थेचे संपर्कप्रमुख अवधूत कदम यांचेही विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

See also  आझाद मैदानातील आश्वासनाला मिळाली गती! शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ग्वाही

‘दक्ष टाइम्स’ विशेष उल्लेख

या उपक्रमासाठी एसटी बसेसचे फलक व जाहिरात फलक तयार करून देणारे ग्राफिक डिझायनर प्रवीण सुखदरे यांचेही संस्थेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.

सर्वांच्या सहकार्यामुळे भविष्यातही अशाच प्रकारचे समाजोपयोगी आणि सेवाभावी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यास पाठबळ मिळेल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तसेच संस्थेच्या कार्याला बळकटी देण्यासाठी अधिकाधिक सभासदांनी आजीव सदस्यत्व स्वीकारून संस्थेच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

गणेशोत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने सर्व सभासद, गणेशभक्त आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

  • Related Posts

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    वल्लभनगर आगारातून जादा एसटी बसची सुविधा; चालक-वाहकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मान, प्रवाशांना आरती पुस्तिकांचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड: गौरी-गणपती उत्सवानिमित्त कोकणातील खेड, रत्नागिरी येथे आपल्या…

    ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

    पिंपरी गावात ‘गिरनार पर्वत दर्शन’चा भव्य देखावा; धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची पर्वणी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक उपक्रमांची परंपरा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

    गणेशभक्तांसाठी सेवाभावी संस्थेची सवलतीच्या दरात बससेवा

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    गौरी-गणपतीसाठी कोकणवासीयांना एसटीची साथ; कोकण खेड युवाशक्तीचा स्तुत्य उपक्रम

    ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

    ५१व्या वर्षात सुवर्ण मित्र मंडळाचा दिमाखदार गणेशोत्सव!

    गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम

    गणेशोत्सवात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’; पुणे जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आरोग्य शिबिरांची धडाकेबाज मोहीम

    रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

    रावेत-वाकडमध्ये कोयत्यांचा धुमाकूळ; दोघे पोलिसांच्या ताब्यात

    किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप

    किशोर आवारे खून खटल्यात साक्षीदारांवर दबावाचे गंभीर आरोप