‘संवाद कौशल्यातून आत्मविश्वासाला बळ द्या!’; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

पीसीसीओईमध्ये प्रथम वर्ष बी.टेक विद्यार्थ्यांचा उत्साहात स्वागत समारंभ; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

पिंपरी: महाविद्यालयीन जीवन हे केवळ शैक्षणिक ज्ञान मिळविण्यापुरते मर्यादित नसून व्यक्तिमत्व घडविण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि संवाद कौशल्य विकसित करावे. स्वतः निर्णय घेण्याची क्षमता वाढली की आत्मविश्वासही वाढतो. महाविद्यालयाकडून उपलब्ध करून दिलेल्या विविध संधींचा पुरेपूर उपयोग करून विद्यार्थ्यांनी आपले उज्ज्वल करिअर घडवावे, असे आवाहन पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे प्रथम वर्ष बी.टेकच्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. कुलकर्णी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

तांत्रिक कौशल्यासोबत स्वतःचे योगदान आवश्यक

प्रशिक्षण व नियुक्ती विभागाचे अधिष्ठाता डॉ. शितलकुमार रवंदळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावावर भाष्य केले. जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेची चर्चा असून, या क्षेत्रामुळे गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. मात्र या संधींचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा व संधी उपलब्ध करून देत असले तरी त्यासाठी विद्यार्थ्यांचेही सातत्यपूर्ण योगदान तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. संदीप पाटील आणि डॉ. अश्विनी वझे यांनी विद्यार्थी सक्षमीकरण, वैयक्तिक विकास, शैक्षणिक उत्कृष्टता आणि जबाबदार नागरिकत्व याबाबत विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन केले. स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी आणि सातत्याने उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले.

पालकांशी साधला संवाद

समारोपाच्या सत्रात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी पालक सभा घेण्यात आली. यावेळी पीसीसीओईमधील शैक्षणिक वातावरण, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या साहाय्य प्रणाली तसेच विविध शैक्षणिक व करिअरविषयक संधींची माहिती पालकांना देण्यात आली.

See also  "उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात 'हरित संकल्प'; वृक्षारोपण, दुग्धाभिषेक आणि महाआरतीने व्यक्त केल्या शुभेच्छा"

कार्यक्रमाला पीसीसीओईचे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. के. राजेश्वरी, अधिष्ठाता डॉ. पी. ए. देशमुख, डॉ. रजनी पी. के., डॉ. एस. व्ही. शिंदे, डॉ. एस. एस. सोनार, डॉ. नरेंद्र देवरे, डॉ. महेश कोलते, डॉ. वर्षा हरपाळे, डॉ. एस. यू. भंडारी, डॉ. रोशनी राऊत, विभाग प्रमुख डॉ. सोनाली पाटील, डॉ. एस. एस. सांबरे, डॉ. ए. डी. ठाकरे, डॉ. अश्विनी वझे, डॉ. जे. व्ही. कट्टी, डॉ. ए. के. गायकवाड, डॉ. एस. बी. माटेकर, डॉ. पी. आर. काळे, शैक्षणिक व सामाजिक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. लीना शर्मा यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वागत डॉ. लीना शर्मा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पेंडम आणि प्रा. रेदिका जॉर्ज यांनी केले, तर आभार प्रा. अंजली साकुरकर यांनी मानले.

  • Related Posts

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : वाहनचालकांच्या योगदानाचा सन्मान करण्यासोबतच सुरक्षित वाहनचालना आणि वाहतूक शिस्तीचा संदेश देण्यासाठी ड्रायव्हर डे उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रवादी वाहतूक सेलचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विनोद वरखडे यांच्या सहभागाने…

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    गुन्हे शाखा युनिट-२ व गुंडाविरोधी पथकाची दिल्ली गाठून मुख्य आरोपीला अटक काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दोन हजार रुपयांसाठी एका व्यक्तीचा खून करून त्याचे हात-पाय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘संवाद कौशल्यातून आत्मविश्वासाला बळ द्या!’; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

    ‘संवाद कौशल्यातून आत्मविश्वासाला बळ द्या!’; डॉ. गोविंद कुलकर्णी यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    ड्रायव्हर डे उत्साहात साजरा; विनोद वरखडे यांच्या पुढाकारातून सुरक्षित वाहनचालनेचा संदेश

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’