घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

गुन्हे शाखा युनिट-३ची दमदार कामगिरी; छत्रपती संभाजीनगरातून आरोपी ताब्यात

काशिनाथ शिंदे

पिंपरी : चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहितेवाडी-शेलपिंपळगाव येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे शाखा युनिट-३ने छडा लावला. पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथून एका आरोपीला ताब्यात घेतले असून, चोरीच्या सोन्याच्या मोबदल्यातून त्याच्या वाट्याला आलेली दोन लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

मोहितेवाडी-शेलपिंपळगाव, ता. खेड येथे राहणारे अमोल एकनाथ पोतले (वय ३२) यांच्या घराच्या मुख्य दरवाजाची कडी व कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला होता. घरातील कपाटाचे लॉक उचकटून सोन्याचे दागिने चोरी करण्यात आले. ही घटना २४ जुलै २०२६ रोजी घडली. याप्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. सुमारे दीड महिन्यापासून पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध घेतला जात होता. तपासादरम्यान पोलिस हवालदार सोनवणे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीतून फिलीप नादर चव्हाण (वय ३३, रा. चिंचोळी पाटील, ता. जि. अहिल्यानगर) याच्याबाबत माहिती मिळाली.

फिलीप चव्हाण हा छत्रपती संभाजीनगर येथे असल्याची माहिती मिळताच पोलिस पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच त्याचा साथीदार छगन चिंतामण काळे (रा. कडा, आष्टी, ता. जि. बीड) याच्यासोबत मिळून चाकण-मोहितेवाडी परिसरात घरफोडी केल्याची माहिती त्याने दिली.

चोरीच्या मालाबाबत चौकशी केली असता, सोन्याच्या मोबदल्यातून मिळालेल्या रकमेतून आरोपीच्या वाट्याला आलेली दोन लाख रुपयांची संपूर्ण रोकड त्याच्याकडून जप्त करण्यात आली.

या गुन्ह्याचा पुढील तपास चाकण दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावारकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

See also  धक्कादायक आरोप! कौटुंबिक जमिनीच्या व्यवहारात फसवणूक; बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनोद धुमाळ यांची मागणी

गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष कसबे, पोलिस उपनिरीक्षक जावळे, गोसावी, तसेच पोलिस अंमलदार सोनवणे, भोरेरे, इचके, सावळे, खेडकर, गुंजाळ, राळे, दांगट आणि थोरात यांच्या पथकाने ही कारवाई केली.

  • Related Posts

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच…

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान ‘सेवा सेतू कॅम्प’; सौर योजनेचा अर्ज आणि बँक कर्जाची सुविधा एकाच छताखाली काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: केंद्र सरकारच्या नवीन आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली

    लोकअदालतीत तडजोडीचा ‘न्याय’! पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणे निकाली