दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

गुन्हे शाखा युनिट-२गुंडाविरोधी पथकाची दिल्ली गाठून मुख्य आरोपीला अटक

काशिनाथ शिंदे

पिंपरी : दोन हजार रुपयांसाठी एका व्यक्तीचा खून करून त्याचे हात-पाय बांधून मृतदेह पाण्यात टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर गुन्ह्याचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी छडा लावला. गुन्हे शाखा युनिट-२ आणि गुंडाविरोधी पथकाने दिल्ली येथे जाऊन मुख्य आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे आठ वाजता एक इसम मुळशी तालुक्यातील दुधारे वस्ती येथून घराबाहेर गेला होता. ‘घराबाहेर जाऊन येतो’ असे सांगून गेलेला तो परत न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वाघजाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, २ सप्टेंबर रोजी दुधारे वस्ती परिसरात संबंधित इसमाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या हात-पायांना बांधून त्याला पाण्यात टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले. खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने ही कृत्ये केल्याने गुन्ह्यातील कलमे वाढविण्यात आली.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश दिले. अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-२चे पथक आणि गुंडाविरोधी पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक विश्लेषणादरम्यान मिळालेल्या माहितीतून मृत व्यक्तीचा खून गाझीपूर, दिल्ली येथील दोन मजूर इसमांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. दोघांनी खून केल्यानंतर मृतदेह पुन्हा दिल्ली येथे नेल्याचे तपासात समोर आले.

यानंतर पोलिसांचे पथक दिल्ली येथे रवाना झाले. आरोपी कचरा वेचण्याचे तसेच मजुरीचे काम करत असल्याने त्यांचे ठिकाण निश्चित करणे आव्हानात्मक होते. तसेच ते मोबाईलचा वापर करत नसल्याने पोलिसांसमोर आणखी अडचणी निर्माण झाल्या. मात्र, पथकाने तीन दिवस पारंपरिक पद्धतीने तपास करून आरोपीचा माग काढला.

See also  आझाद मैदानातील शिक्षक आंदोलनाची 'सरकार'कडून तात्काळ दखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तातडीच्या बैठकीचे आदेश

या कारवाईत गोपाल ऊर्फ राज साधौन विश्वास (वय २०, रा. मुरगी मंडीसमोरील झुग्गीझोपडी, गाझीपूर, दिल्ली; मूळ रा. गाय-बघीपूर, ता. बारासात, जि. उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल) याला दिल्ली येथून ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईत पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, अपर पोलिस आयुक्त बसवराज तेली, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, गुन्हे शाखेचे उपायुक्त सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट-२चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप सावंत, गुंडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर फुंडली, तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीने आरोपीचा माग काढत दिल्लीपर्यंत पोहोचून ही कारवाई करण्यात आली.

  • Related Posts

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    गुन्हे शाखा युनिट-३ची दमदार कामगिरी; छत्रपती संभाजीनगरातून आरोपी ताब्यात काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चाकण दक्षिण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मोहितेवाडी-शेलपिंपळगाव येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा गुन्हे…

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान राज्यभर ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना आवश्यक ओळखपत्रे, विविध प्रमाणपत्रे तसेच…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    दोन हजार रुपयांसाठी खून करून मृतदेहाच्या हात-पायांना बांधून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    घरफोडीचा गुन्हा उघडकीस; दोन लाखांची रोकड जप्त

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    भटके-विमुक्त नागरिकांना हक्काची कागदपत्रे मिळणार!

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पीएम सूर्य घर योजनेची माहिती आता तालुक्यातच; महावितरण उभारणार ‘किओस्क’

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    पिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश!

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा

    भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विभागीय पातळीवर सुनावणी; दोन प्रकरणांचा घेतला आढावा