“उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात ‘हरित संकल्प’; वृक्षारोपण, दुग्धाभिषेक आणि महाआरतीने व्यक्त केल्या शुभेच्छा”

काशिनाथ शिंदे : लोणावळा

लोणावळा,  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त लोणावळा शहरात विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्ह्याचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्षे राबविण्यात येणाऱ्या ‘वृक्ष पंधरवडा’ उपक्रमाचा यंदाही उत्साहात प्रारंभ करण्यात आला.

या उपक्रमांतर्गत लोणावळा शहर आणि परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. वृक्ष पंधरवड्याचा शुभारंभ मच्छिंद्र खराडे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी उद्धव ठाकरे यांच्या निरोगी व दीर्घायुष्यासाठी लोणावळ्यातील बाळूमामा देवस्थान येथे दुग्धाभिषेक करण्यात आला. तसेच अंबरवाडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात महाआरती करून त्यांच्या उत्तम आरोग्य व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ शिवसैनिक शंकर जाधव, माजी विभागप्रमुख सुरेश टाकवे, ज्ञानेश्वर जांभूळकर, सुनिल इंगुळकर, विद्यार्थी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष महेश खराडे, वाहतूक सेनेचे तालुका संघटक दिनेश वीर, नीलेश गोणते, विभागप्रमुख इंद्रजीत तिवारी, सदानंद पिल्लाने, युवा सेनेचे सतीश गोणते, अभिषेक इंगुळकर, विजय चौरे, सौरभ कडू, तेजस खराडे, संदीप यादव, श्रीकांत येवले, सुदेश टाकवे तसेच गणपती मंदिर ट्रस्टचे विश्वस्त अनंता देशमुख यांच्यासह शिवसैनिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांनी वृक्षारोपणासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमातून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा अर्पण केल्या.

See also  हातगाडीवर भांडी विकणाऱ्या वडिलांचे स्वप्न मुलाने केले साकार!
  • Related Posts

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    देहूगावातील वृद्धाश्रम, अनाथ आश्रमाला अन्नदान; विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूगाव : वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव आणि जल्लोष न करता सामाजिक बांधिलकी जपत…

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ३०० हून अधिक विद्यार्थ्यांसह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; आरोग्य तपासणीसोबत आवश्यक साहित्याचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड : भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व, श्रीक्षेत्र देहू-देहूरोड शहर…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    गरजवंतांच्या सेवेत साजरा केला रघुवीर शेलारांचा वाढदिवस

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    रघुवीर शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त देहूरोडमध्ये आरोग्यसेवेचा उपक्रम

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    ऑटोरिक्षा परवान्यांना मोठा दिलासा; मुदतवाढीमुळे वाहनधारकांना दिलासा

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    एमपीएससी परीक्षा प्रक्रियेत मोठे बदल; ‘झिरो लीक’वर भर

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    मातृत्वाला ‘माहेर’ची ऊब; सिंबायोसिसमध्ये ‘माहेरवाशीण’चा शुभारंभ

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!

    महामार्ग घोषित न करताच अतिक्रमणाची नोटीस; उच्च न्यायालयाचा दणका!