“चाकणला मेट्रोची गती! पिंपरी-चिंचवड ते औद्योगिक पट्टा जोडणाऱ्या नव्या मार्गावर महा मेट्रोची निर्णायक बैठक”

काशिनाथ शिंदे : पिंपरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर क्षेत्रातील मेट्रोचे जाळे अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महा मेट्रोची महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय बैठक नुकतीच पार पडली. वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करून नवीन प्रस्तावित मेट्रो मार्गांवर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत भक्ती-शक्ती ते मुकाई चौक तसेच संत तुकाराम नगर – नाशिक फाटा – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६०च्या समांतर चाकणपर्यंत प्रस्तावित मेट्रो मार्गांच्या विकासाला गती देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या मार्गांमुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकणदरम्यानची दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून, भविष्यातील वाहतुकीच्या गरजा लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे.

चाकण हा राज्यातील वेगाने विकसित होणारा औद्योगिक पट्टा असल्याने, या परिसराला मेट्रोची जोड मिळाल्यास हजारो कामगार, नोकरदार, विद्यार्थी आणि नागरिकांना जलद, सुरक्षित व आरामदायी प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. याशिवाय शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवरही मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यास या प्रकल्पाची मदत होणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.

प्रस्तावित मेट्रो मार्गांमुळे औद्योगिक विकासाला चालना मिळण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड आणि चाकण परिसरातील नागरिकांना भविष्यात आधुनिक, जलद आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.

See also  गांजाच्या तस्करीवर पोलिसांचा घणाघात! १२ लाखांचा मुद्देमाल जप्त; तिघे जेरबंद
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर