पिंपळे गुरवमध्ये ४३२ चौ.मी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेची कारवाई सुरूच असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई करण्यात आली. प्रभात नगर येथील सुमारे ४३२ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या आरसीसी बांधकामावर महापालिकेच्या पथकाने कारवाई करत ते जमीनदोस्त केले.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. यामध्ये बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे आणि शिवानी भगत यांच्यासह पाच मजूर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान आणि तीन पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

कारवाईसाठी एक जॉ क्रशर, दोन जेसीबी आणि एक ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई पूर्ण करण्यात आली.

महापालिका प्रशासनाकडून शहरातील अनधिकृत बांधकामांवर यापुढेही नियमानुसार कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोट :

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे. तसेच नियमांचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासात सहकार्य करावे.”

— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

See also  💥 पैशांचा हिशेब जीवावर बेतला! तरुणाचा गळा दाबून निर्घृण खून; हिंजवडीत दोन आरोपी जेरबंद, एक फरार
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर