प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंमलबजावणीवर केले संशोधन; पश्चिम महाराष्ट्रातील समस्या आणि आव्हानांचा घेतला वेध

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे : भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील संशोधन केंद्राच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण करणाऱ्या प्रा. रुपाली पाटील यांना नुकतीच डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पीएचडी) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

‘आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी – पश्चिम महाराष्ट्राच्या विशेष संदर्भातील समस्या आणि आव्हाने‘ या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला होता. आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या विविध अडचणी, समस्या आणि आव्हानांचा त्यांनी आपल्या संशोधनातून अभ्यास केला.

या संशोधनासाठी भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज, पुणे येथील प्रा. डॉ. जयश्री खंदारे यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच न्यू लॉ कॉलेज, पुणेचे प्राचार्य, न्यू लॉ कॉलेज, सांगलीच्या प्राचार्य डॉ. पूजा नरवाडकर आणि यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, कराडचे प्राचार्य डॉ. सतीश माने यांचे सहकार्य लाभले.

प्रा. रुपाली पाटील यांनी मिळवलेल्या या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील वाटचालीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला असून, त्यांच्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

See also  मोशीत अनोळखी महिलेच्या खुनाने खळबळ; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
  • Related Posts

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    नव्या मेट्रो मार्गावर पहिले तिकीट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास; सहा किलोमीटरचा घेतला अनुभव काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे…

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

      हिंजवडी ते शिवाजीनगर प्रवासाचा मार्ग मोकळा; पुणे मेट्रो टप्पा-२ चे भूमिपूजन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न२०३० पर्यंत पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआर क्षेत्र देशाचे महत्त्वाचे वाहतूक केंद्र बनेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

    जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!

    जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक स्पर्धेत एस. बी. पाटील स्कूलचा डंका!

    सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!

    सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणकारी योजनांना गती द्या; लाभ थेट कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवा!