मोशीत अनोळखी महिलेच्या खुनाने खळबळ; भोसरी एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू

मृत महिलेचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे; अज्ञात आरोपीचा शोध सुरू, पोलीस उपनिरीक्षक भोजराज मिसाळ यांच्याकडे तपास

काशिनाथ शिंदे

मोशी: पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एका अनोळखी महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंत्रा मोमेंट हाउसिंग परिसरातील व्यावसायिक कार्यालयाच्या गाळा क्रमांक ७ जवळ या महिलेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती डायल ११२ वरून मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तेथे अंदाजे २५ ते ३० वर्षे वयोगटातील एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

मृत महिलेने भगव्या रंगाचा टी-शर्ट, त्यावर निळसर रंगाचे जॅकेट आणि काळसर व हिरव्या पट्ट्यांची ट्रॅक पँट परिधान केली होती. अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी कारणावरून हत्याराने वार करून गंभीर दुखापत केली आणि महिलेचा खून केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल झाली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मृत महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान

या घटनेनंतर पोलिसांसमोर मृत महिलेची ओळख पटविणे आणि खुनातील आरोपीचा शोध घेणे, ही प्रमुख आव्हाने आहेत. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भोजराज मिसाळ करीत आहेत. तपासातून या घटनेबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

See also  पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची विधानभवनात सदिच्छा भेट
  • Related Posts

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शास्त्रशुद्ध तपास, भक्कम पुरावे आणि न्यायालयीन पाठपुरावा ठरला निर्णायक; कामशेत पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे आरोपीला कठोर शिक्षा काशिनाथ शिंदे : मावळ Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकामशेत : अल्पवयीन मुलीवरील…

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पंचवटी ते चिंचवडे नगर कॉर्नरदरम्यानचा प्रश्न मार्गी; नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील पंचवटी ते चिंचवडे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    तपासाचा ‘दम’ अन् पुराव्यांची ताकद! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपीला कारावासाची शिक्षा; API आकाश पवार यांच्या तपासाला न्यायालयाची पावती!

    शेखर अण्णा चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    शेखर अण्णा    चिंचवडे व विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या उपस्थितीत ५० वर्षांपासून अडथळा ठरणारी उच्चदाब वीजवाहिनी हटविण्याच्या कामाला प्रारंभ

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर