कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि लोकाभिमुख पोलीस प्रशासनाबाबत चर्चा
काशिनाथ शिंदे
मुंबई : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी आज मुंबईतील विधानभवन येथे उपाध्यक्षांच्या कार्यालयातील दालनात सदिच्छा भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षितता आणि पोलीस प्रशासनाशी संबंधित विविध विषयांवर स्नेहपूर्ण चर्चा झाली.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक सक्षम, तत्पर आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच पोलीस प्रशासनाची कार्यक्षमता वाढविणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आणि प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने विचारविनिमय झाला.
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ करण्यासह कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.







