चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

कागदी दिवे, आकर्षक आकाशकंदील अन् पणत्यांच्या निर्मितीतून ‘द लर्निंग नेक्स्ट’च्या विद्यार्थ्यांनी फुलविला सर्जनशीलतेचा प्रकाश

काशिनाथ शिंदे

पिंपरी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा उत्सव! हा आनंद केवळ फटाके आणि फराळापुरता मर्यादित न ठेवता स्वतःच्या कल्पकतेतून सणाचा उत्साह द्विगुणित करण्याचा सुंदर प्रयत्न चिखलीतील मोरेवस्ती येथील ‘द लर्निंग नेक्स्ट’ संस्थेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी केला.

दिवाळीनिमित्त आयोजित विशेष उपक्रमात नर्सरी, एलकेजी आणि यूकेजीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या बालसुलभ कल्पनाशक्तीला कलात्मक रूप देत रंगीबेरंगी कागदी दिवे, आकर्षक आकाशकंदील, क्राफ्ट पेपरपासून सुंदर पणत्या आणि दीपोत्सवाची मनमोहक चित्रे साकारली. चिमुकल्यांनी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या या कलाकृतींमुळे परिसरात जणू सर्जनशीलतेचा दीपोत्सवच फुलला.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संजीवनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध कलाकृती तयार केल्या. आपल्या हातांनी साकारलेल्या कलाकृती पाहून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना कलानिर्मितीचा आनंद मिळण्यासोबतच त्यांच्यातील सर्जनशीलता, कल्पकता आणि स्वहस्ते काहीतरी घडविण्याचा आत्मविश्वास वाढण्यास मदत झाली. लहान वयातच मुलांच्या कलागुणांना वाव देणे आणि त्यांच्यातील सुप्त कौशल्य विकसित करणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा संजीवनी जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या पाल्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून तयार केलेल्या सुंदर कलाकृती पाहून पालकांनीही समाधान व्यक्त केले. चिमुकल्यांच्या या अनोख्या दीपोत्सवाने दिवाळीच्या आनंदात सर्जनशीलतेची अनोखी भर घातली.

See also  आयटीआयमध्ये ड्रायव्हिंग स्कूलचा निर्णय ठरतोय खासगी संस्थांच्या मुळावर; शासनाविरोधात मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक आक्रमक
  • Related Posts

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला; दोन जवान जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या…

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    नव्या मेट्रो मार्गावर पहिले तिकीट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास; सहा किलोमीटरचा घेतला अनुभव काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान