शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला; दोन जवान जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या दुकानांना भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटांनी घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मुख्य अग्निशमन केंद्रासह नेहरूनगर, थेरगाव आणि रहाटणी येथील अग्निशमन पथकांनी संयुक्तपणे केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. जवानांच्या तत्परतेमुळे आग शेजारील दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखली गेली. मात्र, आग विझविताना दोन अग्निशमन जवान किरकोळ जखमी झाले.

आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर जवानांनी दोन्ही दुकानांमध्ये कोणी अडकले आहे का, याची खातरजमा केली. त्यानंतर विविध दिशांनी पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले. दुकानांमध्ये पूजा साहित्य आणि अन्य वस्तूंचा मोठा साठा असल्याने आगीत त्यांचे नुकसान झाले. मात्र, अग्निशमन दलाच्या नियोजनबद्ध कारवाईमुळे आग आजूबाजूच्या दुकानांपर्यंत पोहोचली नाही.

या मोहिमेदरम्यान फायरमन प्रणय शिर्के आणि फायरमन आदिल गोडे हे दोन जवान किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

उप आयुक्त व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, लीडिंग फायरमन विजय घुगे, फायरमन प्रणय शिर्के, फायरमन आदिल गोडे यांच्यासह विविध अग्निशमन केंद्रांतील जवान आणि कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी. आग लागल्याचे निदर्शनास आल्यास तातडीने १०१ या अग्निशमन दलाच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा आणि घटनास्थळाची स्पष्ट माहिती द्यावी, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे.

See also  रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प लादल्यास जनआंदोलनाचा भडका!

आयुक्त विजय सूर्यवंशी यांचे अग्निशमन जवानांच्या कामगिरीचे कौतुक

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या कारवाईचे कौतुक केले. नागरिकांचे जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण करणे हे अग्निशमन दलाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. शगुन चौकातील आगीच्या घटनेत जवानांनी तत्परतेने आणि समन्वयाने कारवाई केल्यामुळे आग लगतच्या दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखता आली. जखमी जवानांना तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचे धाडस आणि कर्तव्यतत्परता कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

  • Related Posts

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    कागदी दिवे, आकर्षक आकाशकंदील अन् पणत्यांच्या निर्मितीतून ‘द लर्निंग नेक्स्ट’च्या विद्यार्थ्यांनी फुलविला सर्जनशीलतेचा प्रकाश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद,…

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    नव्या मेट्रो मार्गावर पहिले तिकीट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास; सहा किलोमीटरचा घेतला अनुभव काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपुणे: पुणे मेट्रोच्या नव्या मार्गाचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान

    प्रा. रुपाली पाटील यांना पीएचडी पदवी प्रदान