विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी दिवाळी मंडई हा उत्तम व्यावसायिक अनुभव – डॉ. कीर्ती धारवाडकर; एसबीपीआयएममध्ये उद्योजकता स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

काशिनाथ शिंदे

पिंपरी : व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव मिळावा, यासाठी दिवाळी मंडई हा उत्तम उपक्रम आहे. या माध्यमातून व्यवसाय नियोजन, किंमत निर्धारण, विपणन, ग्राहकांशी संवाद आणि विक्री व्यवस्थापन यांचे व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते, असे प्रतिपादन एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या संचालक डॉ. कीर्ती धारवाडकर यांनी केले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता विकसित करण्याच्या उद्देशाने दिवाळी मंडई उद्योजक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचे उद्घाटन डॉ. कीर्ती धारवाडकर यांच्या हस्ते झाले.

यावेळी शैक्षणिक विभागप्रमुख डॉ. रूपाली कुदरे, डॉ. भूषण परदेशी, डॉ. स्वप्नील सोनकांबळे, डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन, डॉ. प्रणिता बुरबुरे, डॉ. इरम अन्सारी, डॉ. योगेंद्र देवकर, डॉ. अमरीश पद्मा, डॉ. संतोष शिंदे, डॉ. विशाल वाघ, डॉ. दिलीप पवार, डॉ. पद्मलोचन बिसोई, डॉ. समीर ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समन्वयक डॉ. काजल महेश्वरी यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना स्वतःच्या व्यावसायिक संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी या मंडईतून मिळाली. संघभावना, नेतृत्वगुण आणि निर्णयक्षमता यांचा अनुभव घेतानाच शाश्वत उत्पादने, पर्यावरणपूरक पॅकेजिंग आणि डिजिटल विपणनाच्या माध्यमातून बदलत्या व्यावसायिक संधींची ओळख विद्यार्थ्यांना झाली.

या मंडईत विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, दिवाळी सजावटीच्या वस्तू, पर्यावरणपूरक उत्पादने आणि विविध खेळांचे आकर्षक विक्री दालन उभारले होते. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध कलागुणांचे सादरीकरण केले. महिला सक्षमीकरण आणि स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वयं-सहाय्यता गटांनाही व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यामध्ये हस्तकला वस्तू, पारंपरिक उत्पादने, सणासुदीच्या भेटवस्तू आणि खाद्यपदार्थांचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली.

See also  महापौर कार्यालयात आमदार शंकर जगताप यांची सदिच्छा भेट; शहर विकास व सार्वजनिक वाहतुकीवर सविस्तर चर्चा

स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

स्पर्धेतील विविध गटांमध्ये पुढील संघांनी यश संपादन केले :

बेस्ट बिझनेस पिच – टीम शुभ लाभ

बेस्ट डिजिटल मार्केटिंग कॅम्पेन – टीम दिवाळी नक्षत्र

बेस्ट डिजिटल प्रॉडक्ट डिझाइन – टीम स्वदेस

वेशभूषा स्पर्धेत मिस्टर एथनिक एलिगन्सचा किताब आयुष देवकांत याने पटकावला, तर प्रथमेश शेटे उपविजेता ठरला. मिस एथनिक एलिगन्सचा किताब रितिका माळी हिने पटकावला, तर शुभदा बोरसे उपविजेती ठरली. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. काजल महेश्वरी, डॉ. अनिशकुमार कारिया आणि स्वाती सातपुते यांनी समन्वयक म्हणून विशेष योगदान दिले.

  • Related Posts

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    अग्निशमन दलाच्या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला; दोन जवान जखमी, सुदैवाने जीवितहानी नाही काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : पिंपरीतील शगुन चौक परिसरात मध्यरात्री दोन पूजा साहित्याच्या…

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    कागदी दिवे, आकर्षक आकाशकंदील अन् पणत्यांच्या निर्मितीतून ‘द लर्निंग नेक्स्ट’च्या विद्यार्थ्यांनी फुलविला सर्जनशीलतेचा प्रकाश काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद,…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    महिला पायलटच्या हाती मेट्रोचे सारथ्य; मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थिनी, आयटी कर्मचाऱ्यांशी संवाद!

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    पुणे मेट्रोच्या विस्ताराने शहराच्या विकासाला नवी गती; मोदींच्या हस्ते मार्गिका-३चे लोकार्पण

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा

    फिडेल सॉफ्टटेकचा जागतिक विस्तार झेपावणार! २०० कोटींची उलाढाल असलेल्या सॉफ्टेंजर कंपनीच्या अधिग्रहणाची घोषणा