शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

थेरगावच्या यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ प्रकल्पाचा शुभारंभ; आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते उद्घाटन

काशिनाथ शिंदे

पिंपरी : शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेतच करून परिसर स्वच्छ आणि कचरामुक्त ठेवण्याचा उद्देश असलेला ‘स्वच्छ, सुंदर, शून्य कचरा शाळा’ हा उपक्रम पिंपरी-चिंचवड शहरासाठी दिशादर्शक ठरणार आहे. शाळेपासून सुरू होणारी ही चळवळ पुढे शून्य कचरा प्रभाग आणि संपूर्ण शहर कचरामुक्त करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.

थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत या प्रकल्पाचे उद्घाटन आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते

कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे, शिक्षण समितीच्या सभापती रवीना आंगोळकर, शिक्षण समिती सदस्या तथा नगरसदस्या रिटा सानप, नगरसदस्या योगिता बारणे, नगरसदस्य तानाजी बारणे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, आरोग्य अधिकारी अतुल सोनवणे, मुख्याध्यापक श्रीकांत चौगुले, बाबासाहेब राठोड, पर्यवेक्षिका अर्चना कांडेकर, ज्योती तापकीर, शून्य कचरा शाळा मार्गदर्शक अर्चना मोरे आदी उपस्थित होते.

नगरसदस्या योगिता बारणे यांच्या पुढाकारातून थेरगाव शाळेत हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांना शून्य कचरा पुनर्वापर पिशव्या आणि शून्य कचरा संचाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

आयुक्त डॉ. सूर्यवंशी म्हणाले, शाळेत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन शाळेच्या परिसरातच झाले पाहिजे, ही या उपक्रमामागील मुख्य संकल्पना आहे. त्यासाठी शाळेत ‘शून्य कचरा निरीक्षक’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शाळेत कोणी कचरा टाकत असल्यास त्याला समजावून सांगणे आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

या मोहिमेत विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून त्यांनी आपल्या पालकांनाही कचऱ्याचे वर्गीकरण, घरातील स्वच्छता आणि योग्य विल्हेवाट याबाबत जागरूक करावे. थेरगाव शाळेत हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि उपक्रमाचे परिणाम तपासल्यानंतर शहरातील अन्य शाळांमध्येही त्याची अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

See also  दिवाळीच्या आनंदावर सायबर चोरांचा डोळा! क्राईम ब्रँच युनिट-३चा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्या योगिता बारणे यांनी केले. प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी आभार मानले.

‘पुस्तक वाचा अन् मला फोन करा!’

यावेळी आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्वच्छता के सुपरहीरोज’ या पुस्तकाचे वाटप केले. प्रत्येक विद्यार्थ्याने हे पुस्तक वाचून स्वच्छतेचा सुपरहिरो बनावे. स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून करून ती घरापर्यंत आणि तेथून संपूर्ण शहरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

पुस्तक वाचल्यानंतर त्यातून काय शिकायला मिळाले, कोणत्या नव्या गोष्टी समजल्या, याबाबत विद्यार्थ्यांनी आपल्याला आवर्जून फोन करून सांगावे, असेही त्यांनी सांगितले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी मोबाईलपेक्षा पुस्तक वाचन, खेळ आणि चांगल्या सवयींना अधिक महत्त्व दिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पीएम श्री शाळेतील आधुनिक सुविधांची पाहणी

दरम्यान, आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी थेरगाव येथील पीएम श्री माध्यमिक शाळेलाही भेट दिली. तेथील खगोलशास्त्र प्रयोगशाळा, नवोपक्रम प्रयोगशाळा, रायफल शूटिंग प्रशिक्षण केंद्र आणि सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी करून माहिती घेतली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकासासाठी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचे त्यांनी कौतुक केले. तसेच शाळेच्या भिंतींवर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक वारली चित्रांची पाहणी करून त्यांच्या कलागुणांना दाद दिली.

  • Related Posts

    अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

    आनंदी मैत्री प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रम; फराळासह नवीन कपड्यांचे वाटप काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नचिंबळी : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, प्रेम आणि आपुलकीची देवाणघेवाण. हाच सामाजिक बांधिलकीचा…

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अत्याधुनिक पोलीस आयुक्तालयाची उभारणी; दिवंगत अजित पवार यांच्या योगदानाचा मुख्यमंत्र्यांकडून आवर्जून उल्लेख काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास पोलीस यंत्रणेची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

    अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

    अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय कल्पनांना दिवाळी मंडईत व्यावसायिक व्यासपीठ!

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    शगुन चौकात मध्यरात्री अग्नितांडव! दोन पूजा साहित्याची दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!

    चिमुकल्यांच्या कल्पकतेतून साकारला दिवाळीचा दीपोत्सव!