दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

रात्रीच्या सिंचनाची कटकट कमी होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ५ मेगावॅट प्रकल्पाचे लोकार्पण

काशिनाथ शिंदे

पुणे : शेतीच्या विकासासाठी सिंचनासोबतच दिवसा आणि पुरेशा दाबाने वीज उपलब्ध होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाल्यास शेतीचे नियोजन अधिक सुलभ होऊन त्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडण्यास मदत होईल. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत उभारण्यात येणारे सौरऊर्जा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी केले.

खेड तालुक्यातील पानमंदवाडी येथे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ मेगावॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी (दि. ४) उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. चाकण येथे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या २० व्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी हा कार्यक्रम झाला. या प्रकल्पामुळे कडूस वीज उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या २ हजार ५०४ शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे.

शेतीसाठी दिवसा वीज मिळाल्याने शेतकऱ्यांना सिंचनाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांना पाणी देण्याची गरज कमी होणार असल्याने बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्यांपासून होणारा संभाव्य धोका टाळण्यासही मदत होईल. राज्यभरात विकेंद्रित स्वरूपात सौरऊर्जा प्रकल्प उभारून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे काम शासनाकडून सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

पानमंदवाडी येथील या प्रकल्पाची उभारणी अवाडा कंपनीने केली असून, त्यासाठी सुमारे २० कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. प्रकल्पात निर्माण होणारी वीज ५.८ किलोमीटर लांबीच्या ११ केव्ही वाहिनीद्वारे ३३ केव्ही कडूस उपकेंद्रापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर सौरऊर्जेची निर्मिती करून तिचा उपयोग शेतीपंपांसाठी केला जाणार आहे.

कडूस उपकेंद्रांतर्गत एकूण ८ हजार ६४३ वीजग्राहक असून, त्यापैकी २ हजार ५०४ कृषी ग्राहक आहेत. वाढत्या विजेच्या मागणीचा विचार करून उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त उच्चदाब रोहित्र बसविण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उपकेंद्राची एकूण क्षमता १५ एमव्हीए होणार आहे.

See also  🚩 रावेतमध्ये ‘जय जगन्नाथ’च्या जयघोषात भव्य रथयात्रा; १५ हजारांहून अधिक भाविकांची उत्स्फूर्त उपस्थिती

यावेळी आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीपअण्णा मोहिते पाटील, चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मनिषा गोरे उपस्थित होत्या. महावितरणतर्फे पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर, पुणे ग्रामीण मंडळाचे अधीक्षक अभियंता सुरेश सवाईराम, कार्यकारी अभियंता केशव काळुमाळी, तसेच अवाडाचे फतेह सिंग आणि मुर्तुजा काझी यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

  • Related Posts

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    अभिषेक बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; खेळाडूंना परदेशी स्पर्धांसाठी आर्थिक मदत, विविध प्रभागांतील कामांचा मार्ग मोकळा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या साप्ताहिक…

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती; राज्यातील ८० टक्के कृषिपंपांना सध्या दिवसा वीज – महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांची माहिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई :…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

    अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

    अनाथ मुली अन् वृद्धांच्या चेहऱ्यावर फुलविला दिवाळीचा आनंद!

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    डायल ११२ चा प्रतिसाद अवघ्या तीन मिनिटांत! पिंपरी-चिंचवड पोलीस महाराष्ट्रात अव्वल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस