पीसीयूमध्ये आंतरराष्ट्रीय ‘क्रेस्ट सीटीएफ २.०’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच देशांतील १,६०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
काशिनाथ शिंदे
पिंपरी : सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील वाढते धोके लक्षात घेता प्रत्येकाने सायबर सुरक्षेबाबत जागरूक होणे गरजेचे आहे. सायबर सुरक्षेसाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नसून, मिळवलेल्या ज्ञानाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि कौशल्यांचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन क्विक हिल आणि सिक्रीट लॅबचे वरिष्ठ संचालक जसविंदर सिंह यांनी केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सतर्फे ‘हॅक टुडे अ सेफर टुमारो’ या संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय ‘क्रेस्ट सीटीएफ २.०-२०२६’ सायबर सुरक्षा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाइन आणि प्रत्यक्ष अशा दोन्ही पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत भारतासह दुबई, पाकिस्तान, ब्रिटन आणि अमेरिकेतील १,६०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला.
पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर व नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आणि कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा तज्ज्ञ होण्यासाठी सातत्याने नवनवीन गोष्टी शिकणे, तांत्रिक कौशल्य विकसित करणे आणि नैतिक हॅकिंगच्या माध्यमातून डिजिटल जगाच्या संरक्षणासाठी योगदान देणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन स्कूल ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे प्रमुख डॉ. कमलेश मेश्राम यांनी केले.
यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, संरक्षण प्रकल्पांचे तज्ज्ञ लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, सायबर सिक्युअर्ड इंडियाचे संस्थापक निखिल महादेश्वर, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, परीक्षा नियंत्रक डॉ. अंजू बाला, अमित पाटील, शैक्षणिक विभागाचे अधिष्ठाता डॉ. सचिन पवार, आयक्यूएसएसचे अध्यक्ष डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा, हायरॉशील्डचे संस्थापक प्रियांशु कुक्कर, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीच्या संचालक शिफा सायकलवाला आणि संस्थापक संचालक रोहित गौतम आदी उपस्थित होते.
लेफ्टनंट कमांडर विवेक कामत, निखिल महादेश्वर, शिफा सायकलवाला, प्रियांशु कुक्कर, रोहित गौतम, डॉ. हॅरॉल्ड डी’कोस्टा आणि डॉ. सचिन पवार यांनीही विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेच्या विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
या स्पर्धेला सीटीएफ ७, थंडरसिफेर, झेड ७ सिक्युरिटी सोल्युशन्स, व्हाईटएरो, एनवायएक्स, हिरो शील्ड, सिक्युरिटी बोट आणि टीसेकफोर्ज यांचे सहकार्य लाभले. बानुबा कोडे यांनी आभार मानले.






