‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी तीन विद्यार्थ्यांची निवड

काशिनाथ शिंदे

पिंपरी : आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धेत पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (पीसीसीओई) विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची चमक दाखवत घवघवीत यश संपादन केले. संगमनेर येथे आयोजित ‘जल्लोष २०२६’ या सांस्कृतिक स्पर्धेत महाविद्यालयाने तीन पारितोषिके पटकावली. विशेष म्हणजे, या तिन्ही विजेत्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळ आणि संगमनेर येथील शिक्षण प्रसारक संस्था, कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत भारतीय शास्त्रीय गायन प्रकारात सानिया मुंगारे हिने प्रथम क्रमांक, व्यंगचित्र स्पर्धेत जयदीप वाकडे याने द्वितीय क्रमांक, तर रांगोळी स्पर्धेत चंचल वर्मा हिने तृतीय क्रमांक पटकावला. या तिन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या कलात्मक कौशल्याच्या जोरावर महाविद्यालयाचा नावलौकिक उंचावला.

या यशाबद्दल पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीलकंठ चोपडे, अधिव्याख्याते डॉ. पद्माकर देशमुख आणि उपअधिव्याख्याते डॉ. राजेश फुरसुले यांनी आर्ट सर्कलच्या संघाचे तसेच मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे सांस्कृतिक समन्वयक डॉ. मसनाजी नुकुलवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

See also  आई-वडिलांच्या चरणी संस्कारांची वंदना! दिंडोरी प्रणित सेवा केंद्रात २६ जुलैला भव्य मातृ-पितृ पूजन व सरस्वती संस्कार सोहळा
  • Related Posts

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    पीसीयूमध्ये आंतरराष्ट्रीय ‘क्रेस्ट सीटीएफ २.०’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; पाच देशांतील १,६०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : सायबर सुरक्षेच्या क्षेत्रातील वाढते धोके…

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    रात्रीच्या सिंचनाची कटकट कमी होणार; उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ५ मेगावॅट प्रकल्पाचे लोकार्पण काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : शेतीच्या विकासासाठी सिंचनासोबतच दिवसा आणि पुरेशा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    शहरातील विकासकामांना स्थायी समितीची मंजुरी; रस्ते, आरोग्य आणि नागरी सुविधांना प्राधान्य

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!

    शाळेतच कचऱ्याचे व्यवस्थापन; शून्य कचरा शहराच्या दिशेने महापालिकेचे पाऊल!