रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

शेतकऱ्यांना संरक्षित रकमेच्या १.५ टक्केच विमा हप्ता; कृषी विभागाचे योजनेत सहभागी होण्याचे आवाहन

काशिनाथ शिंदे

पुणे : रब्बी हंगाम २०२६-२७ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही योजना राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.

पुणे जिल्ह्यात एच.डी.एफ.सी. एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. रब्बी हंगामातील अधिसूचित पिकांसाठी संरक्षित रक्कम निश्चित करण्यात आली असून, शेतकऱ्यांना संरक्षित रकमेच्या केवळ १.५ टक्के विमा हप्ता भरावा लागणार आहे.

पिकनिहाय विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे :

गहू (बागायती) – ४५ हजार रुपये प्रति हेक्टर

ज्वारी – ३६ हजार रुपये प्रति हेक्टर

हरभरा – ३६ हजार रुपये प्रति हेक्टर

उन्हाळी भुईमूग – ४० हजार ६०० रुपये प्रति हेक्टर

रब्बी कांदा – ९५ हजार रुपये प्रति हेक्टर

रब्बी मका – ५० हजार रुपये प्रति हेक्टर

पीक नोंदणी बंधनकारक

योजनेत सहभागी होण्यासाठी ॲग्रीस्टॅक शेतकरी ओळखपत्र, बँक खात्याचा तपशील आणि जमीनधारणा उतारा आवश्यक आहे. तसेच डिजिटल पीक सर्वेक्षणांतर्गत १०० टक्के पीक नोंदणी करणे बंधनकारक आहे. प्रति अर्ज किमान ०.१० हेक्टर क्षेत्राची अट असून, कर्जदार आणि बिगरकर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करून योजनेत सहभागी होता येणार आहे.

गतवर्षी २०२५-२६ मध्ये पुणे जिल्ह्यातील ३ हजार ८६४ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. यंदा दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांनी पीक विम्याचे संरक्षण घ्यावे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

See also  "उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त लोणावळ्यात 'हरित संकल्प'; वृक्षारोपण, दुग्धाभिषेक आणि महाआरतीने व्यक्त केल्या शुभेच्छा"
  • Related Posts

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    पुणे जिल्ह्यातील १२ हजार ८८६ शेतकऱ्यांना ७८.९४ कोटींचा दिलासा; राज्यातील एकूण २०.७२ लाख शेतकऱ्यांना लाभ काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : राज्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा…

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    चाकणमध्ये मर्सिडीज-बेंझच्या अत्याधुनिक इलेक्ट्रिक जीएलसी वाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण; ३,२०० कोटींची गुंतवणूक, रोजगाराच्या १८ हजार संधी काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे: महाराष्ट्राला केवळ…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    ‘जल्लोष २०२६’मध्ये पीसीसीओईचा जल्लोष! तीन पारितोषिकांवर कोरले यशाचे नाव

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    सायबर सुरक्षेसाठी केवळ ज्ञान नव्हे, कौशल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची – जसविंदर सिंह

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा

    दिवसा वीजेचा उजेड! पानमंदवाडीचा सौर प्रकल्प सुरू; २,५०४ शेतकऱ्यांना मोठा दिलासा