महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ; एकरकमी भरणा केल्यास मूळ थकबाकीत २० टक्क्यांपर्यंत सवलत

काशिनाथ शिंदे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीजबिलांच्या थकबाकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महावितरणने बिगरकृषी वीजग्राहकांसाठी ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेची अंमलबजावणी शुक्रवार, ६ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून १५ जानेवारी २०२७ पर्यंत ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे. विशेष म्हणजे, थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ केला जाणार असून मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत अतिरिक्त सवलत मिळणार आहे.

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी प्रकाशगड मुख्यालयात योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

१५ डिसेंबरपर्यंत भरणा केल्यास विशेष सवलत

योजनेच्या सुरुवातीपासून १५ डिसेंबर २०२६ पर्यंत मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना विशेष सवलत मिळणार आहे. लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी तीन वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत दिली जाणार आहे. इतर लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत मिळेल.

हप्त्यांनी भरण्याचीही सुविधा

एकरकमी रक्कम भरणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठीही महावितरणने दिलासा दिला आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम आगाऊ भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरता येणार आहे. उच्चदाब ग्राहकांना थकबाकीच्या प्रमाणानुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा उपलब्ध असेल.

याशिवाय, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी वीजजोडणी पुन्हा सुरू करताना प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीमध्ये आणखी पाच टक्के सवलत मिळणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क, तसेच लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क पूर्णपणे माफ केले जाणार आहे.

See also  पीएमआर-०१ स्थानकातील पाणीगळतीचे कारण स्पष्ट; निचरा पाइपमधील अडथळा दूर

 

३४ लाखांहून अधिक ग्राहकांना लाभाची संधी

महावितरणच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे तब्बल ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत.

तर ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी असून त्यातील १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ केले जाणार आहे.

कोणाला मिळणार योजनेचा लाभ?

३१ मार्च २०२६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व अन्य बिगरकृषी ग्राहक या योजनेसाठी पात्र असतील. तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांनाही याचा लाभ घेता येईल. कृषी ग्राहक आणि सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजनांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. महावितरणच्या वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील पात्र ग्राहकांनाही ही योजना लागू राहणार आहे.

योजनेचा अर्ज करण्यासाठी ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपवर ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. थकबाकीदार ग्राहकांनी या संधीचा लाभ घेऊन वीजबिलांचा प्रलंबित प्रश्न निकाली काढावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  • Related Posts

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; सात महत्त्वपूर्ण सुधारणांसह कृषी सौरकरणाचा आदर्श देशासमोर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: अक्षय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या…

    मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

    मद्यपान करताना झालेल्या वादातून ४२ वर्षीय मित्राची हत्या; खाडीकिनारी फेकलेला मृतदेह पोलिसांनी शोधला, मदत करणारा दुसराही अटकेत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्न  डोंबिवली : मद्यपान करताना…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

    महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

    मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!

    महाराष्ट्राला जागतिक मोबिलिटी केंद्र बनविण्याचे लक्ष्य; ‘मेक इन’नंतर आता ‘इनोव्हेट इन महाराष्ट्र’चा नवा संकल्प!