थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू

व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ; मूळ थकबाकीवरही २० टक्क्यांपर्यंत सवलत – एकरकमी भरणा करणाऱ्यांना विशेष लाभ

काशिनाथ शिंदे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीजबिलांची थकबाकी असलेल्या ग्राहकांना महावितरणने मोठा दिलासा दिला आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या बिगरकृषी ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय योजना २०२६-२७’ जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार असून, मूळ थकबाकी एकरकमी भरल्यास २० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. शुक्रवार, ६ नोव्हेंबरपासून ही योजना सुरू होत असून १५ जानेवारी २०२७ पर्यंत ग्राहकांना तिचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी प्रकाशगड मुख्यालयात योजनेचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी महावितरणचे विविध संचालक व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

एकरकमी भरणा करणाऱ्यांना विशेष सवलत

या योजनेत ग्राहकांची थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ केला जाणार आहे. उर्वरित मूळ थकबाकी एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, १५ डिसेंबर २०२६ पर्यंत एकरकमी भरणा करणाऱ्या ग्राहकांना ‘अर्ली बर्ड रिबेट’चा लाभ मिळणार आहे.

लघुदाब घरगुती व व्यावसायिक ग्राहकांची वीजजोडणी तीन वर्षांपर्यंत कायमस्वरूपी खंडित असल्यास मूळ थकबाकीवर १० टक्के, तर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ खंडित असल्यास २० टक्के सवलत मिळणार आहे. या ग्राहकांव्यतिरिक्त इतर लघुदाब व उच्चदाब ग्राहकांना अनुक्रमे १० आणि १५ टक्के सवलत दिली जाणार आहे.

हप्त्यांचीही सुविधा; पुनर्जोडणी शुल्क माफ

एकरकमी रक्कम भरणे शक्य नसलेल्या ग्राहकांसाठीही महावितरणने सुविधा उपलब्ध केली आहे. लघुदाब ग्राहकांना ५० टक्के रक्कम सुरुवातीला भरून उर्वरित रक्कम सहा समान व्याजमुक्त मासिक हप्त्यांत भरण्याची मुभा असेल. उच्चदाब ग्राहकांना थकबाकीनुसार तीन ते सहा व्याजमुक्त हप्त्यांची सुविधा मिळणार आहे.

See also  सतिशदादा मोटे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात सेवाकार्याचे संकल्प

याशिवाय, २० किलोवॉटपर्यंत मंजूर भार असलेल्या ग्राहकांनी पुनर्जोडणीच्या वेळी प्रीपेड स्मार्ट मीटरचा पर्याय निवडल्यास मूळ थकबाकीवर अतिरिक्त पाच टक्के सवलत मिळणार आहे. योजनेत सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांचे पुनर्जोडणी शुल्क, तर लघुदाब ग्राहकांचे सेवा जोडणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. मागणीनुसार वीजजोडणीची पुनर्जोडणी तातडीने केली जाणार आहे.

सुमारे ३७ लाख ग्राहकांना लाभाची संधी

महावितरणच्या आकडेवारीनुसार, ३१ मार्च २०२६ पर्यंत कृषी व सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना वगळता कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ३४ लाख ८६ हजार ग्राहकांकडे तब्बल ७ हजार ६५० कोटी रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये २ हजार ९२ कोटी रुपयांचे व्याज व विलंब आकार माफ होणार आहेत.

तसेच ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित झालेल्या २ लाख ६० हजार ८२९ ग्राहकांकडे ४८८ कोटी ७८ लाख रुपयांची थकबाकी आहे. या ग्राहकांचे १६३ कोटी ९३ लाख रुपयांचे व्याज माफ करण्यात येणार आहे.

ऑनलाइन अर्जाची सुविधा

‘अभय योजना २०२६-२७’चा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुलभ आणि ऑनलाइन ठेवण्यात आली आहे. ग्राहकांना महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा मोबाईल अॅपद्वारे अर्ज करता येणार आहे. थकबाकीच्या ओझ्यामुळे वीजजोडणीपासून वंचित राहिलेल्या बिगरकृषी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

  • Related Posts

    महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

    व्याज आणि विलंब आकार १०० टक्के माफ; एकरकमी भरणा केल्यास मूळ थकबाकीत २० टक्क्यांपर्यंत सवलत काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वीजबिलांच्या थकबाकीचा प्रश्न…

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान; सात महत्त्वपूर्ण सुधारणांसह कृषी सौरकरणाचा आदर्श देशासमोर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई: अक्षय ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू

    थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू

    महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

    महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    अक्षय ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्राची देशात दुसरी झेप!

    मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

    मित्राच्या हत्येनंतर स्वप्नांचा छळ; तीन आठवड्यांनी आरोपीची पोलिसांत शरणागती!

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    रब्बी हंगामासाठी पीक विम्याचे कवच; पुणे जिल्ह्यात योजना लागू!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!

    ४.८७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ४,७६५ कोटींची कर्जमुक्तीची रक्कम जमा!