महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!

३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे घेऊन कार्ड नोंदणी व वितरणाचे एसटी महामंडळाचे निर्देश

काशिनाथ शिंदे

पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांसाठी सवलतीचे तिकीट मिळवताना आवश्यक करण्यात आलेल्या एनसीएमसी (NCMC) कार्डच्या सक्तीला तूर्तास शिथिलता देण्यात आली आहे. महिला प्रवाशांची मोठी संख्या, कार्ड नोंदणी व वितरणातील अडचणी आणि ग्रामीण भागातील महिलांमध्ये असलेली माहितीची कमतरता लक्षात घेऊन एसटी महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार एनसीएमसी कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्यात येणार आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने ४ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भातील परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी १ ऑक्टोबर २०२६ पासून ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळवण्यासाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, महिला लाभार्थ्यांची मोठी संख्या पाहता अद्याप अपेक्षित प्रमाणात कार्ड नोंदणी व वितरण झालेले नसल्याचे निदर्शनास आले आहे.

महिला लाभार्थ्यांसाठी आतापर्यंत केवळ १.१० कोटी एनसीएमसी कार्डची नोंदणी अथवा वितरण झाले आहे. विशेषतः ग्रामीण आणि खेड्यापाड्यातील अनेक महिलांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचलेली नसल्याने मोठ्या प्रमाणावर नोंदणी बाकी असल्याचे महामंडळाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना एसटीच्या सवलतीपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी कार्डची अनिवार्यता ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, या कालावधीत सर्व महिला लाभार्थ्यांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी संबंधित विभाग नियंत्रकांना ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ग्रामपंचायत सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून ही शिबिरे राबविण्यात येणार आहेत.

या मोहिमेंतर्गत ३१ डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत १०० टक्के एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामीण भागातील महिलांनी या संधीचा लाभ घेऊन लवकरात लवकर कार्ड नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

See also  मॅरेथॉन स्पर्धेत किवळेच्या ज्येष्ठ नागरिकांची बाजी; दिलीप रोकडे प्रथम
  • Related Posts

    दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत

    सीईआयआर प्रणालीच्या मदतीने येरवडा परिमंडळाची दमदार कामगिरी; दिवाळीच्या मुहूर्तावर नागरिकांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : दिवाळीच्या सणानिमित्त पुणे शहर पोलिसांनी नागरिकांना अनोखी…

    पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास

    दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही मेट्रोला मोठी पसंती; गर्दीच्या वेळी दर पाच मिनिटांनी धावणार, एनसीएमसी कार्ड सुविधेलाही प्रतिसाद काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!

    महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!

    दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत

    दिवाळीचा अनोखा नजराणा! पुणे पोलिसांनी शोधले ४० हरवलेले मोबाईल; १० लाखांचे फोन नागरिकांना परत

    पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास

    पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास

    पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!

    पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोला प्रवाशांचा ‘५० हजारांचा’ प्रतिसाद!

    अनाथ, दिव्यांग मुलांसोबत कोकण खेड युवाशक्तीचा दिवाळीचा आनंदोत्सव!

    अनाथ, दिव्यांग मुलांसोबत कोकण खेड युवाशक्तीचा दिवाळीचा आनंदोत्सव!

    थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू

    थकबाकीदार वीजग्राहकांना महावितरणचा मोठा दिलासा! ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू