कराची स्वीट मार्टसह अनेक मिठाई विक्रेत्यांवर धडक कारवाई; विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांना नोटिसा
काशिनाथ शिंदे
पुणे : दिवाळीच्या सणात मिठाई खरेदी करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत तब्बल १ हजार ४३५ किलो मिठाई व खाद्यपदार्थ जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि साठवणुकीच्या नियमांची तपासणी करण्यासाठी FDA कडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरातील कराची स्वीट मार्टमध्ये तपासणी केली असता मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा असे एकूण १८६ किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले. या साठ्याची किंमत ९० हजार ७८० रुपये आहे. खाद्यरंग वापराच्या नोंदी, खव्याची साठवणूक व हाताळणी तसेच कालबाह्य घटकांच्या वापराबाबत त्रुटी आढळून आल्या.

वानवडी येथील पौर्णिमा स्वीट्स आणि केशवनगर-मुंढवा येथील जनता स्वीट्स यांच्याकडे आवश्यक परवाना व नोंदणी नसल्याचे आढळल्याने व्यवसाय बंद करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.
मोहम्मदवाडी येथील बिकानेर मिठाईवाल्यांकडील २६८ किलो बर्फी अयोग्य साठवणूक व हाताळणीमुळे जप्त करून नष्ट करण्यात आली. पिंपळे सौदागर येथील भायल स्वीट्समधून ९२.५ किलो खाद्यपदार्थ, तर काळेवाडीतील पुणेरी स्वीट्समधून ३५ किलो कलाकंद जप्त करण्यात आला.
दरम्यान, शिक्रापूर येथील श्री गणेश लाडूवाले यांच्याकडून सर्वाधिक ६०५ किलो मिठाई, तर मंचर येथील राजमिलन स्वीट्समधून २५० किलो मीठा मावा जप्त करून नष्ट करण्यात आला. याशिवाय मुळशी तालुक्यातील मान-बोडकेवाडी येथील चामुंडा माँ रबडीवाला आणि शिवाजीनगर गावठाणातील न्यू क्वालिटी डेअरी फार्मवरही प्रशासनाने कारवाई केली.
मिठाई खरेदी करताना नागरिकांनी सावध राहावे!
दिवाळीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने FDA ने तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावेत, हा या मोहिमेचा उद्देश आहे. मिठाई खरेदी करताना स्वच्छता, गुणवत्ता, उत्पादनाची तारीख आणि विक्रेत्याचा परवाना याकडे नागरिकांनी लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात येत