दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ३ कोटी ६८ लाखांची भरघोस मदत; अधिकारी ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

काशिनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि ग्रामीण जनतेला मदतीचा हात देण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांचे योगदान दिले आहे. या मदतीचा धनादेश शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव लोकेश चंद्र आणि ऊर्जा विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी मुंबईतील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मदतीचा धनादेश प्रदान केला.

यावेळी ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर (संचालन), योगेश गडकरी (वाणिज्य), अनुदीप दिघे (वित्त) आणि राजेंद्र पवार (मानव संसाधन) उपस्थित होते.

राज्यातील अनेक भागांत दुष्काळाचे भीषण संकट निर्माण झाले असून शेतकरी आणि ग्रामीण नागरिक अडचणीत सापडले आहेत. या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, या उद्देशाने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने आर्थिक योगदान दिले. विशेष म्हणजे, वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपासून ते क्षेत्रीय स्तरावर कार्यरत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

मुख्यमंत्र्यांकडून महावितरणचे कौतुक

मदतीचा धनादेश स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणच्या अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे विशेष आभार मानले. दुष्काळाच्या कठीण काळात महावितरणने दाखवलेली सामाजिक संवेदनशीलता कौतुकास्पद असून, या मदतीमुळे दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महावितरणने वीजपुरवठ्याच्या जबाबदारीसोबतच सामाजिक बांधिलकीही जपली आहे. संकटाच्या काळात राज्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका या आर्थिक योगदानातून पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.

See also  अनधिकृत जाहिरात फलकांवर महापालिकेचा हातोडा!

हरित ऊर्जेतील महाराष्ट्राच्या यशाचेही मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन

दरम्यान, केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय आणि पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या मूल्यांकनानुसार, ‘रिन्युएबल एनर्जी स्टेट असेसमेंट फ्रेमवर्क’ (RE-SAF) अंतर्गत हरित ऊर्जेची निर्मिती आणि विकासामध्ये महाराष्ट्राने देशातील राज्यांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

या राष्ट्रीय स्तरावरील यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपर मुख्य सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह

महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ३ कोटी ६८ लाख १७ हजार ८८७ रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र. समवेत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर.

  • Related Posts

    पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

    रोबोटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर सुरक्षा, हॅकेथॉनसह विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांचे प्रभावी प्रदर्शन काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी, पुणे : विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, तांत्रिक कौशल्यांना आणि नवोपक्रमांना व्यासपीठ…

    पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा

    आमदार शंकर जगताप यांची घोषणा; भाऊसाहेब भोईर यांच्या ‘कलाकार कट्ट्या’चा वर्धापन दिन विविध कलाविष्कारांनी उत्साहात साजरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नाटक, संगीत आणि कला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

    पीसीसीओईच्या ‘टेकफेस्ट २०२६’मध्ये तंत्रज्ञानाचा जागर; १,५०० हून अधिक स्पर्धकांचा सहभाग

    दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!

    दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी महावितरणचे हात सरसावले!

    पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा

    पिंपरी-चिंचवडमध्ये रंगभूमीला नवे बळ! ‘कै. नाना पाटेकर स्मृती करंडक’ राज्यस्तरीय नाट्यस्पर्धेची घोषणा

    दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट

    दिवाळीच्या मिठाईवर FDA चा हातोडा! पुणे जिल्ह्यात १,४३५ किलो मिठाई जप्त करून नष्ट

    रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा

    रेल्वे फाटकाचा अडथळा कायमचा दूर! पिंपरी डेअरी फार्म उड्डाणपुलाचे लोकार्पण; वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा

    महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!

    महिलांना एसटी सवलतीसाठी एनसीएमसी कार्डची सक्ती तूर्तास शिथिल!