शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

मनीषा तपस्वी यांचे मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये ‘यशस्वी उद्योजक’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

काशिनाथ शिंदे

पिंपरी पुणे समाजासमोर असलेल्या समस्यांवर उपाय शोधून त्यांचे व्यवसायाच्या संधीत रूपांतर करणे, हीच यशस्वी उद्योजकतेची खरी ओळख आहे. उद्योजक म्हणून यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्धता, वेळेचे योग्य नियोजन आणि पैशांचे प्रभावी व्यवस्थापन या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, असे प्रतिपादन ‘दे आसरा फाउंडेशन’च्या व्यवस्थापक मनीषा तपस्वी यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे उद्योजकता कक्ष आणि दे आसरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्वी उद्योजक’ या विषयावर उद्योजकता कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनीषा तपस्वी, स्नेहा दिवेकर आणि एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर उपस्थित होत्या.

कार्यशाळेत मार्गदर्शन करताना दे आसरा फाउंडेशनच्या स्नेहा दिवेकर म्हणाल्या की, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवडीच्या क्षेत्रात कामाचा अनुभव घ्यावा. इतरांसोबत काम करून त्यांना मदत करावी, कामकाज समजून घ्यावे आणि त्यानंतर स्वतःच्या व्यवसायाची सुरुवात करावी. उद्योजकतेसाठी योग्य मानसिकता हा महत्त्वाचा आधारस्तंभ असून, आपल्या सभोवतालच्या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करून त्यातून नव्या संधी शोधणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी स्वतःचा स्वतंत्र वैयक्तिक ब्रँड निर्माण करण्यावर भर द्यावा. पुढील पाच वर्षांत आपल्याला काय बनायचे आहे, याचे स्पष्ट ध्येय निश्चित करून त्यानुसार नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. वेळेचा अपव्यय टाळणे, नवीन व्यक्तींशी संपर्क वाढवणे आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासणे हे गुण यशस्वी उद्योजक होण्यासाठी महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

See also  सेवा सेतू अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; १७५० ग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती

कार्यशाळेच्या समन्वयकपदाची जबाबदारी सहयोगी प्राध्यापक डॉ. योगेंद्र देवकर यांनी पार पाडली.

  • Related Posts

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    दशकपूर्तीच्या स्नेहमेळाव्यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी; साडेतीन तास रंगली गप्पांची मैफल ‘दिशा सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा गौरव Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या…

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    ज्ञानेश्वर लांडगे : हा पुरस्कार पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान; विठ्ठल काळभोर : पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नवोन्मेष, संशोधन आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर

    दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर

    ‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद

    ‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद

    पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू

    पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू