राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

दशकपूर्तीच्या स्नेहमेळाव्यात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी; साडेतीन तास रंगली गप्पांची मैफल

‘दिशा सन्मान’ पुरस्काराने कर्तृत्ववान व्यक्ती आणि संस्थांचा गौरव

काशिनाथ शिंदे

पिंपरी, पुणे: राजकीय मतभेद, आरोप-प्रत्यारोप आणि वर्चस्वाच्या राजकारणाला बाजूला ठेवत विविध राजकीय पक्षांचे नेते, प्रशासकीय अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, कलाकार, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर एकाच व्यासपीठावर एकत्र आले. निमित्त होते दिशा सोशल फाऊंडेशनच्या दशकपूर्ती दिवाळी फराळ सोहळ्याचे! काळेवाडी येथील ‘रागा पॅलेस’मध्ये शनिवारी (दि. ७) आयोजित या स्नेहमेळाव्यात मान्यवरांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तब्बल साडेतीन तास रंगलेल्या गप्पांच्या मैफलीत स्नेहबंध अधिक दृढ झाले.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या दिवाळी फराळ उपक्रमाचे यंदा दहावे वर्ष होते. या दशकपूर्ती सोहळ्याला पिंपरी-चिंचवडचे महापौर रवी लांडगे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, बापूसाहेब पठारे, शंकर मांडेकर, अमित गोरखे, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

याशिवाय भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, शिवसेनेचे शहराध्यक्ष चेतन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, माजी शहराध्यक्ष वसंत लोंढे, अजित गव्हाणे, सचिन साठे, सदाशिव खाडे, नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, विनोद नढे, अमित गावडे, सुरेश भोईर, तुषार हिंगे, माजी नगरसेवक धनंजय काळभोर, सुजीत पाटील, यशवंत भोसले, निवृत्ती शिंदे, विष्णुपंत नेवाळे, माणिकराव अहिरराव, महेश कुलकर्णी, राजेंद्र बाबर, अमित बाबर, निलेश शिंदे, अनिल लोंढे, हेमंत फुगे, उमेश लोंढे, रमेश काशीद, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे उपस्थित होते.

See also  सराईत गुन्हेगार शरद कोळी यास MPDA अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विशाल वाकडकर, इंद्रायणी बँकेचे संस्थापक ॲड. एस. बी. चांडक, प्रेरणा बँकेचे अध्यक्ष कांतीलाल गुजर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, वसंत काटे, विजय जगताप, उमेश चांदगुडे, मनोज जरे, अशोक पुजारी, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे, महापालिकेचे नगरसचिव उल्हास जगताप, उपायुक्त अण्णा बोदडे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, गणेश कवठेकर, नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष राहुल भंडारे, लेखक-दिग्दर्शक संतोष पवार, राजेश शिंदे, नितीन धुंदुके, ‘कलोपासक’चे प्रदीप पाटसकर, ‘लीड मीडिया’चे प्रमुख विनोद सातव, ‘किमया कम्युनिकेशन्स’चे जयंत शिंदे आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

दिशा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राजेंद्र करपे, संतोष बाबर, नंदकुमार कांबळे, संतोष निंबाळकर, गोरख भालेकर, नाना शिवले, सचिन साठे यांच्यासह फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी सोहळ्याचे नियोजन केले. अक्षय मोरे यांनी सूत्रसंचालन केले, तर बाजीराव लोखंडे यांनी आभार मानले.

मान्यवरांचा ‘दिशा सन्मान’; कर्तृत्वाचा गौरव

दशकपूर्ती दिवाळी फराळाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा ‘दिशा सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला.

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेश सूर्यवंशी यांचा निवृत्त विभागीय आयुक्त दिलीप बंड, आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

चिंचवड येथील आगीच्या दुर्घटनेत प्रसंगावधान राखत धाडस दाखवून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या आर्या विजय कांबळे या धाडसी युवतीचा महापौर रवी लांडगे आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

पुण्यात सलग सात प्रयोग करून विश्वविक्रमाची नोंद करणाऱ्या आणि हजाराव्या प्रयोगाचा टप्पा गाठणाऱ्या लोकप्रिय बालनाट्य ‘अलबत्या-गलबत्या’च्या चमूचाही गौरव करण्यात आला. निर्माते राहुल भंडारे, अभिनेत्री श्रद्धा हांडे, सनी मुणगेकर आणि निलेश गोपनारायण यांनी हा सन्मान स्वीकारला.

See also  अवैध देशी दारू साठ्यावर गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; १५ हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

जगभरात लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘द फोक आख्यान’च्या चमूचा शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अर्णव कोतकर, शुभम साळवी, विश्वजीत लोंढे आणि अभिजीत लोंढे यांनी सन्मान स्वीकारला.

हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांचा आमदार शंकर मांडेकर, अमित गोरखे आणि डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रसिद्ध नाटककार, लेखक आणि दिग्दर्शक संतोष पवार यांचा ‘चंद्ररंग’चे संचालक विजय जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

दरम्यान, ‘पीसी७’ वाहिनीचे प्रमुख आणि पत्रकार संदेश पुजारी यांचा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते दिशा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दिशा सोशल फाऊंडेशनच्या दशकपूर्ती दिवाळी फराळाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना एकत्र आणत स्नेह, संवाद आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर संदेश दिला.

  • Related Posts

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    मनीषा तपस्वी यांचे मार्गदर्शन; एसबीपीआयएममध्ये ‘यशस्वी उद्योजक’ कार्यशाळा उत्साहात संपन्न काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी पुणे समाजासमोर असलेल्या समस्यांवर उपाय शोधून त्यांचे व्यवसायाच्या संधीत रूपांतर करणे,…

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    ज्ञानेश्वर लांडगे : हा पुरस्कार पीसीईटीच्या व्यवस्थापनाचा सन्मान; विठ्ठल काळभोर : पीसीसीओईच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : नवोन्मेष, संशोधन आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर

    दिवाळीत आग दुर्घटना रोखण्यासाठी अग्निशमन दल सज्ज! शहरातील २२ संवेदनशील ठिकाणांवर विशेष नजर

    ‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद

    ‘सावली’त आयुक्तांची मायेची दिवाळी! ७५ बेघर बांधवांसोबत डॉ. विजय सूर्यवंशी यांचा स्नेहसंवाद

    पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू

    पिंपळे गुरवमध्ये मानवी अवशेष आढळल्याने खळबळ! धारदार शस्त्राने कापलेला पाय रस्त्यावर; सांगवी पोलिसांकडून तपास सुरू