सराईत गुन्हेगार शरद कोळी यास MPDA अंतर्गत येरवडा कारागृहात स्थानबद्ध

सोलापूर ग्रामीण पोलिसांची प्रतिबंधात्मक कारवाई; सांगलीतून घेतले ताब्यात

काशिनाथ शिंदे

सोलापूर : सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगार शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) याच्यावर पोलिसांनी MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी यांनी शरीराविरुद्ध तसेच मालमत्तेविरुद्ध वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि नागरिकांना उपद्रव निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम सुरू आहे.

९ गंभीर गुन्हे दाखल

पोलीस माहितीनुसार, शरद कोळी याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, घातक हत्याराचा वापर करून इच्छापूर्वक दुखापत करणे, जबरी चोरी यांसह विविध गंभीर स्वरूपाचे एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. पंढरपूर तालुका, सांगोला, कामती, मंगळवेढा आणि मंद्रुप पोलीस ठाण्यांच्या हद्दीत त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्याबाहेर नांदेड आणि जळगाव जिल्ह्यांतही त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यापूर्वीही शरद कोळी याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून हद्दपारी करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही त्याने गुन्हेगारी कृत्ये सुरूच ठेवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

MPDA अंतर्गत प्रस्ताव सादर

शरद कोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार यांनी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेचा प्रस्ताव सादर केला.

प्रस्तावाची पडताळणी केल्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्तिकेयन यांनी शरद कोळी यास MPDA कायद्यान्वये स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.

See also  भोसरीतील खून प्रकरणाचा २४ तासांत छडा; दोन आरोपींसह तीन विधिसंघर्षित बालक ताब्यात

सांगलीतून पोलिसांच्या ताब्यात

स्थानबद्धतेचे आदेश जारी झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या पथकाने शरद कोळीचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याचा माग काढत त्यास सांगली जिल्ह्यातून ताब्यात घेतले.

त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी त्यास पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शरद कोळी यास पुढील स्थानबद्धतेसाठी येरवडा कारागृहात जमा करण्यात आले.

सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर

सोलापूर ग्रामीण पोलीस हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या तसेच वाळू तस्करी, अवैध दारू विक्री यांसारख्या बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांचे गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले आहेत. अशा गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही MPDA कायद्यान्वये कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल वि. कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, सहायक पोलीस निरीक्षक विजय शिंदे तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार सहभागी झाले. जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील उत्कर्ष देवकुळे आणि नायब तहसीलदार विलास म्हेत्रे यांनीही स्थानबद्धतेच्या प्रक्रियेत सहभाग घेतला.

सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांची भूमिका अधिक कठोर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    ५ कामांच्या करारासाठी लाचेची मागणी; १९ हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील मुख्य अभियंता प्रमोद…

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवड महापालिकेला लाचखोरीचा धक्का! पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता प्रमोद ओभासे लाचप्रकरणी ताब्यात

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न