प्रेक्षकांच्या तुडुंब गर्दीत हास्याचा ‘ऑल दि बेस्ट’

‘वरवरचे वधू-वर’नेही दाखविला नात्यांचा आरसा; नाट्यरसिकांच्या तुफान गर्दीने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह हाऊसफुल

काशिनाथ शिंदे

पिंपरी : हास्याचे क्षण, मैत्रीची ताकद, बदलती नाती आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न अशा विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या दोन नाटकांनी मंगळवारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात रंगत आणली. ‘ऑल दि बेस्ट’ या विनोदी नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसविले, तर ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने आजच्या पिढीचा प्रेम आणि विवाहाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोन विनोदी पद्धतीने मांडला. दोन्ही नाट्यप्रयोगांना नाट्यरसिकांची तुडुंब गर्दी झाली. कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

मराठी भाषा, साहित्य, कला आणि संस्कृतीचा परिचय नागरिकांना व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा, या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली सप्ताहातील विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाच्या निमित्ताने मंगळवारी दुपारच्या सत्रात देवेंद्र पेम लिखित ‘ऑल दि बेस्ट’ या नाटकाचा प्रयोग झाला. मयुरेश पेम, मनमित पेम आणि निखिल चव्हाण यांच्या अभिनयाने नाटकाला चांगली रंगत आली. विनोदी प्रसंग आणि मिश्कील संवादांमुळे प्रेक्षकांना मनमुराद हसता आले. त्याचवेळी शारीरिक अक्षमतेवर मात करून आत्मविश्वासाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोनही नाटकातून मांडण्यात आला. मैत्री, परस्परांना साथ देण्याचे महत्त्व आणि संकटांवर मात करण्याची जिद्द यांचा संदेश या नाटकातून देण्यात आला. कलाकारांच्या अभिनयाला रसिकांनी भरभरून दाद दिली. या प्रयोगासाठी प्रेक्षागृह पूर्णपणे भरले होते.

सायंकाळच्या सत्रात विराज कुलकर्णी लिखित-दिग्दर्शित ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाचा प्रयोग झाला. सुव्रत जोशी, सखी गोखले आणि सूरज पारसनीस यांच्या अभिनयाने सजलेल्या या नाटकातून आजची पिढी प्रेम आणि विवाहाकडे कशा दृष्टिकोनातून पाहते, याचे चित्रण करण्यात आले. विवाहाचा निर्णय घेताना तरुण-तरुणींच्या मनातील संभ्रम, नात्यांमधील अपेक्षा आणि नाते स्वीकारताना येणाऱ्या अडचणी यावर नाटकातून विनोदी पद्धतीने भाष्य करण्यात आले.

See also  ससूनच्या इमर्जन्सीत सिक्युरिटीची दादागिरी? रुग्णांच्या नातेवाईकांकडून गंभीर तक्रारी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

विषय आजच्या पिढीशी संबंधित असल्याने अनेक प्रसंगांमध्ये प्रेक्षकांना स्वतःचे अनुभव जाणवले. मिश्कील संवाद, सहज अभिनय आणि प्रसंगनुरूप विनोदामुळे नाटकाला चांगली रंगत आली. मनोरंजनासोबतच बदलत्या नातेसंबंधांकडे नव्या नजरेने पाहण्याचा विचारही या नाटकातून मांडण्यात आला. या प्रयोगालाही रसिकांनी मोठी गर्दी केली.

‘ऑल दि बेस्ट’मधून विनोद, गमती-जमती आणि प्रसंगांच्या माध्यमातून सकारात्मकतेचा संदेश रसिकांपर्यंत पोहोचला, तर ‘वरवरचे वधू-वर’मधून बदलत्या काळातील नातेसंबंध, त्यातील गुंतागुंत आणि माणसांच्या भावविश्वाचा वेध घेण्यात आला. दोन्ही नाटकांनी वेगवेगळ्या विषयांना हात घालत रसिकांचे भरभरून मनोरंजन केले.

‘अभिजात मराठी भाषा सप्ताहा’निमित्त आयोजित या नाट्यप्रयोगांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षवेधी ठरला. नाटक सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत प्रेक्षकांचा उत्साह आणि कलाकारांच्या अभिनयाला मिळणारी दाद यामुळे प्रेक्षागृहात जल्लोषाचे वातावरण होते. दर्जेदार मराठी नाटक पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने मराठी रंगभूमीविषयी पिंपरी चिंचवडकरांची असलेली आस्था पुन्हा अधोरेखित झाली.

गुरुवार, दि. ८ ऑक्टोबर रोजी विविध कार्यक्रम

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड

सकाळी ८.३० वाजता : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विजय पटवर्धन लिखित ‘चार्ली – चॅपलिन आणि जादूचा कंठमणी’ हे बालनाट्य.

दुपारी १२ वाजता : ‘गजल आख्यान’.

दुपारी ३.३० वाजता : ‘चांगभलं – व्हॉईस ऑफ दख्खन’.

सायंकाळी ५.३० वाजता : कवी वैभव जोशी यांच्या स्वरचित कविता-गझलांचा ‘द मनमौजी’.

रात्री ९.३० वाजता : मराठी संगीताचे विविध पैलू उलगडणारा ‘म…मराठीचा’ हा सांगीतिक सोहळा.

नटसम्राट निळूफुले नाट्यगृह, सांगवी

दुपारी १२ वाजता : ‘वंदे मातरम्’च्या १५०व्या वर्षानिमित्त ‘कथा वंगभंगाची’ हे नाटक.

सायंकाळी ५ वाजता : ‘सूर तरुणाईचा.. ध्यास मराठीचा’ कार्यक्रम.

गायक : विनल देशमुख, वर्षा एखंडे, अश्विनी मिटे.

  • Related Posts

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    एकता दौड, रक्तदान शिबिर, व्याख्यान, नाट्यप्रयोग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे महापालिकेचे आवाहन Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नकाशिनाथ शिंदे पिंपरी : सरदार वल्लभभाई पटेल…

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली; १७ दुचाकींसह चारचाकी वाहनांचे नुकसान काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : चिंचवड येथील चाफेकर चौक परिसरातील कुणाल मार्केटच्या पार्किंगमध्ये गुरुवारी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ ऑक्टोबरपासून ‘सरदार प्रबोधन पर्व २०२६’चे आयोजन

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    चिंचवडमधील कुणाल मार्केटच्या पार्किंगला भीषण आग; १५ नागरिकांची सुखरूप सुटका

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    नगरसेवक स्वेच्छा निधीच्या विनियोगासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना भेटवस्तू स्वीकारण्यास मनाई

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    खान्देश माळी मंडळाचा वधू-वर पालक परिचय मेळावा उत्साहात संपन्न

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश

    यशवंतभाऊ भोसले यांच्या ‘विनम्र अभियान पदयात्रे’ला यश; कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचे महापौरांचे निर्देश