ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार

अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते सन्मान; विधी क्षेत्रातील योगदानासह महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

काशिनाथ शिंदे

पुणे : विधी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक कार्यातील सक्रिय सहभागाची दखल घेत ॲड. डॉ. प्रियंका नारायण खंडाळे यांना राष्ट्रीय स्तरावरील ‘एक्सलन्स इन मेडिको लीगल प्रॅक्टिस अँड सोशल वेल्फेअर लीडरशिप’ पुरस्काराने गौरविण्यात आले. माजी खासदार, राज्यसभा सदस्य तथा प्रसिद्ध अभिनेत्री जयाप्रदा यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

इनसाईड सक्सेस मीडिया यांच्या वतीने आयोजित पुरस्कार सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. ॲड. डॉ. खंडाळे या रिपब्लिकन सन्मान सभेच्या महाराष्ट्र राज्य कायदेशीर सल्लागार तथा अध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून त्या विधी आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. महिलांना त्यांच्या कायदेशीर अधिकारांची जाणीव करून देणे, अन्यायग्रस्तांना कायदेशीर मार्गदर्शन करणे, तसेच वंचित आणि गरजू घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय महिला धम्म परिषदेत त्यांनी संयोजिका म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. महिला सक्षमीकरण, बौद्ध धम्माचा प्रसार आणि भारतीय संविधानातील मूल्यांची जनजागृती यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचीही विशेष दखल घेण्यात आली आहे. यापूर्वी भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या हस्तेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि विधी क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

See also  पीसीयूमधील उच्च तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून कौशल्य सिद्ध करावे
  • Related Posts

    स्नेहवनमधील चिमुकल्यांसोबत आयुक्त दाम्पत्याची दिवाळी; शिक्षणासाठी टॅबची भेट!

    आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांशी डॉ. विजय सूर्यवंशी व डॉ. आरती सूर्यवंशी यांचा जिव्हाळ्याचा संवाद; आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा दिला मंत्र काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : दिवाळीचा आनंद…

    राष्ट्रीय स्वच्छता अभियानात पिंपरी-चिंचवडची दमदार भरारी!

    स्वच्छ सर्वेक्षणातील कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल; लोकसहभाग, प्रशासकीय समन्वय आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ठरला ठसा काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: स्वच्छता व्यवस्थापन, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि नागरिकांच्या सक्रिय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार

    ॲड. डॉ. प्रियंका खंडाळे यांना राष्ट्रीय पुरस्कार

    स्नेहवनमधील चिमुकल्यांसोबत आयुक्त दाम्पत्याची दिवाळी; शिक्षणासाठी टॅबची भेट!

    स्नेहवनमधील चिमुकल्यांसोबत आयुक्त दाम्पत्याची दिवाळी; शिक्षणासाठी टॅबची भेट!

    राष्ट्रीय स्वच्छता अभियानात पिंपरी-चिंचवडची दमदार भरारी!

    राष्ट्रीय स्वच्छता अभियानात पिंपरी-चिंचवडची दमदार भरारी!

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    राजकीय मतभेद बाजूला; दिशा फाऊंडेशनच्या दिवाळी फराळाला दिग्गजांची मांदियाळी!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    शिस्त, वेळ आणि पैशांचे व्यवस्थापन हीच यशस्वी उद्योजकतेची गुरुकिल्ली!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!

    पीसीसीओईला आयआयसीचे ‘फोर स्टार’ मानांकन; राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय यशाची उज्ज्वल परंपरा कायम!