नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती; आधुनिक भारताच्या उभारणीतील नेहरूंच्या योगदानाचे स्मरण

काशिनाथ शिंदे

पिंपरी: स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यानिमित्त महापालिकेतील त्यांच्या प्रतिमेस तसेच नेहरूनगर येथील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

या वेळी आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य राहुल भोसले, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे, नेताजी शिंदे, युवराज दाखले, नितीन घोलप, बाबासाहेब राठोड, उषामाई वाघमारे यांच्यासह महापालिकेचे विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग नोंदवत देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याबरोबरच शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाचा भक्कम पाया घालण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांनी दिलेले योगदान देशाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

See also  दाट लोकवस्तीत गॅस चोरीचा धोकादायक धंदा; दिघी पोलिसांचा छापा
  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या