हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
काशिनाथ शिंदे
देहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान, आधुनिक भारताचे शिल्पकार आणि भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती तसेच बालदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, तसेच बालकांना खाऊचे वाटप करून बालदिनाचा आनंद द्विगुणित करण्यात आला.
हा कार्यक्रम पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक हाजीमलंग काशीनाथ मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
यावेळी देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर काशीनाथ मारीमुत्तू आणि मावळ तालुका अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष गफूर भाई शेख यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. बालदिनाचे औचित्य साधून उपस्थित लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास सचिव गोपाळ व्यंकोबा राव, सचिव बबन टोम्पे, सामाजिक कार्यकर्ते अशोक कुसळे, ज्येष्ठ नेते माणिक वाघमारे, युवा नेते विष्णू नारसाप्पा, शंकर मारीमुत्तू, शिवाजी भोसले, येशू भंडारी, पर्यावरण विभागाचे अध्यक्ष आकाश रामनारायण, युवा नेते ज्ञानेश्वर पाटोळे, भारतराज मारीमुत्तू, सत्या स्वामी यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बालदिनाच्या निमित्ताने बालकांना खाऊवाटप करून काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा दिवस आनंदात साजरा केला.






