अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट

काशिनाथ शिंदे

पिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि मानवतावादी मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) महाविद्यालयाच्या वतीने सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयाच्या अ‍ॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभागांतर्गत एफइएसए आणि लाईफ स्किल्स सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दीपोत्सव’ हा उपक्रम उत्साहात पार पडला.

या उपक्रमांतर्गत प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा आणि कलात्मकतेचा वापर करून आकर्षक आकाशकंदील तयार केले, तसेच हाताने रंगविलेले पणत्या विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या. या विक्रीतून जमा झालेला निधी पिंपरी-चिंचवड येथील संत मोणी बाबा अनाथ आश्रम आणि झुंज दिव्यांग संस्था यांना दिवाळी भेट म्हणून देण्यात आला.

याशिवाय महाविद्यालयाच्या वतीने आश्रमाला धान्य, किराणा साहित्य, मिठाई आणि दैनंदिन गरजेच्या वस्तू भेट देण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी आश्रमातील मुलांसोबत विविध खेळ खेळत, गप्पा मारत आणि आनंदाचे क्षण अनुभवत दिवाळी साजरी केली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकी जपण्याची आणि गरजूंच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याची प्रेरणा मिळाली.

या उपक्रमात पीसीसीओईआरचे संचालक व प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, प्रा. वैशाली निंबाळकर, प्रा. रूपाली पाटील, प्रा. गजानन जाधव, प्रा. राजेश पाटील यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ तावरे, संस्कृती बिरादार, निमिष कदम, सार्थक आटोळे, कुणाल तायडे, अथिला पाटील, संजना गाडगे, समृद्धी लांडे आदी सहभागी झाले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

See also  कोयता गँगचा पुन्हा रक्तरंजित धुमाकूळ! १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; ४ आरोपी जेरबंद, भर पावसात पोलिसांनी काढली धिंड

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी दिवाळीचा खरा अर्थ केवळ दिव्यांच्या रोषणाईत नसून, इतरांच्या आयुष्यात आनंदाचा प्रकाश पसरविण्यात आहे, हा संदेश दिला.

  • Related Posts

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन, महापुरुषांच्या विचारांचा होणार जागर काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : थोर क्रांतीगुरू लहुजी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या