उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण; तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन, महापुरुषांच्या विचारांचा होणार जागर
काशिनाथ शिंदे
पिंपरी : थोर क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते हा अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्याचे स्मरण केले.
या कार्यक्रमाला आमदार अमित गोरखे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, जेजुरी संस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदंडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते नाना कांबळे, भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, संजय धुतडमल, युवराज दाखले, भगवान शिंदे, संजय ससाणे, उत्तम सकटे, मारुती सोनटक्के, आशा शहाणे, सतीश भवाळ, बाळासाहेब रसाळ, संदीप जाधव, सुनील भिसे, विशाल कसबे, बाळासाहेब खंदारे, वैशाली जाधव, भारती चांदणे, केशरताई लांडगे, गणेश कलवले, शिवाजी खडसे, सुहास यादव, अनिकेत साळवे, हरिमान खवळे, भाऊ कसबे, झुंबरताई लांडगे, उषामाई वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्त्यांनीही क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
तीन दिवस विचारांचा जागर
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रबोधन पर्वाच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार, त्यांचे सामाजिक योगदान आणि परिवर्तनवादी कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या तीन दिवसीय पर्वात प्रबोधन गीतांचे सादरीकरण करण्यात येणार असून, गीतांच्या माध्यमातून महापुरुषांचे कार्य, विचार आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडला जाणार आहे. नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची ओळख व्हावी, त्यांचे प्रेरणादायी कार्य समाजापर्यंत पोहोचावे आणि सामाजिक समतेचा विचार अधिक व्यापक व्हावा, या उद्देशाने महापालिकेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.






