मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने हल्ला; मेव्हण्यासह तिघे पोलिसांच्या जाळ्यात, १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठड

काशिनाथ शिंदे

नागपूर : शहरातील गजबजलेल्या मेडिकल चौक परिसरात भररस्त्यात झालेल्या पलाश ऊर्फ गणी प्रकाश वासनिक याच्या निर्घृण हत्येने नागपूर हादरले आहे. गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) रात्री साडेदहाच्या सुमारास चहाच्या टपरीजवळ हा थरारक प्रकार घडला. धारदार शस्त्राने करण्यात आलेल्या हल्ल्यात पलाशचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी त्याच्या मेव्हण्यासह तिघांना अटक केली आहे.

कौटुंबिक वादातून हत्येचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पलाशने २०२० मध्ये आयुष ऊर्फ चिंटू धुपे याच्या बहिणीशी विवाह केला होता. मात्र, वैवाहिक आयुष्यात वारंवार वाद होत असल्याने पलाश आणि आयुष यांच्यात तणाव निर्माण झाला होता. आपल्या बहिणीला पलाशकडून त्रास होत असल्याचा आयुषचा आरोप होता. घटनेच्या रात्री दारूसाठी पैशांची मागणी केल्यावरून दोघांमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. याच वादातून हत्येचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

मेव्हण्यासह तिघांना अटक

या प्रकरणी अजनी पोलीस आणि गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तिघांना अटक केली. त्यामध्ये आयुष ऊर्फ चिंटू दीपक धुपे, अथर्व दिनेश भगत आणि सुमेध शैलेश मेश्राम यांचा समावेश आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

मृत पलाशवर २२ गुन्ह्यांची नोंद

दरम्यान, पलाश वासनिक याच्यावर यापूर्वी तब्बल २२ गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर तो दोन महिन्यांपूर्वीच कारागृहातून बाहेर आला होता. या हत्येमागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि हल्ल्याचा घटनाक्रम याचा तपास पोलीस करत आहेत.

भरचौकात घडलेल्या या हत्याकांडामुळे नागपूरमधील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

See also  पहिल्याच दिवशी पुणे मेट्रोची धडाकेबाज सुरुवात! ५० हजार प्रवाशांचा प्रवास
  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन