नात्यांची वीण घट्ट बांधणाऱ्या चंद्रभागा भालेराव काळाच्या पडद्याआड!

आदर्शमाता चंद्रभागाताईंचे ८४ व्या वर्षी निधन; प्रेम, माया आणि कौटुंबिक संस्कारांचा वारसा मागे

काशिनाथ शिंदे

पिंपरी : पिंपरीगावातील आदर्शमाता चंद्रभागा सुदाम भालेराव (वय ८४) यांचे मंगळवारी (दि. १० नोव्हेंबर) वृद्धापकाळाने खडकवासला (ता. हवेली) येथे निधन झाले. त्या गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ पिंपरी येथे वास्तव्यास होत्या. प्रकृती आणि वयोमानामुळे गेल्या पाच-सहा महिन्यांपासून त्या खडकवासला येथे आपल्या भावाकडे राहत होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षाचे राज्य उपाध्यक्ष राजू भालेराव यांच्या त्या मातोश्री होत.

त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, नातसुना आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे.

चंद्रभागाताईंचा स्वभाव अत्यंत शांत, मनमिळाऊ आणि प्रेमळ होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणीचा आदर्श जपत त्यांनी संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या जडणघडणीसाठी समर्पित केले. स्वतः अशिक्षित गृहिणी असूनही कुटुंबाला संस्कारांची शिदोरी देण्यात आणि संसाराचा गाडा समर्थपणे सांभाळण्यात त्यांचे योगदान मोलाचे होते. घर आणि कुटुंब हीच त्यांची कर्मभूमी होती.

नातेसंबंधांना आयुष्यात सर्वोच्च स्थान देणाऱ्या चंद्रभागाताईंनी आपल्या प्रेमळ स्वभावातून नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवली होती. नातेवाईकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत त्यांनी मोठा नातलग परिवार एकत्रित ठेवला. त्यांच्या सहवासात नातेवाईकांचा कायम राबता असायचा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला आपुलकीने जोडून ठेवण्याची त्यांची हातोटी विशेष होती.

स्वतःला शिक्षणाची संधी मिळाली नसली, तरी पुढील पिढीने उच्च शिक्षण घेऊन प्रगती करावी, ही त्यांची मनापासून इच्छा होती. त्यांच्या संस्कारांमुळे कुटुंबात शैक्षणिक वातावरण निर्माण झाले. त्यांच्या चार मुलांपैकी एक मुलगा बारावीपर्यंत, तर तीन मुले बी.कॉम. पदवीधर आहेत. मुलगीही बी.कॉम. पदवीधर असून जावई पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. सुनांमध्ये दहावी, बारावी तसेच बी.कॉम. आणि बी.ए. पदवीधरांचा समावेश आहे. नातवंडांनीही बी.कॉम., बी.ए., बी.एस्सी. आणि विद्युत अभियांत्रिकीपर्यंत शिक्षण घेतले आहे. काही नातवंडे उच्च शिक्षण घेत असून नातसुना देखील पदवीधर आहेत.

See also  मोशी कचरा डेपो दुर्घटना : बचावकार्यास युद्धपातळीवर वेग; ९ कर्मचारी सुखरूप, उर्वरितांच्या सुटकेसाठी रात्रंदिवस प्रयत्न"

पन्नास वर्षांहून अधिक काळ पिंपरीला आपली कर्मभूमी मानून राहिलेल्या चंद्रभागाताईंनी प्रेम, माया, आपुलकी आणि संस्कारांच्या बळावर कुटुंबाला एकसंध ठेवले. त्यांच्या निधनाने भालेराव कुटुंबीयांनी प्रेमळ मातृछत्र गमावले असून नातेवाईक आणि परिचितांकडून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आठवणी आणि संस्कारांचा ठेवा कायम कुटुंबीयांच्या स्मरणात राहील.

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या