लहुजी वस्ताद साळवे विचारांचा जागर; चिंचवडमध्ये तीन दिवस प्रबोधन पर्वाची मेजवानी!

१४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान सांस्कृतिक, वैचारिक, साहित्यिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन; मान्यवरांची राहणार उपस्थिती

काशिनाथ शिंदे

पिंपरी : क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक समतेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १४ ते १६ नोव्हेंबरदरम्यान चिंचवड स्टेशन (पेट्रोल पंपाशेजारी) येथे ‘क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व २०२६’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय महोत्सवात सांस्कृतिक, वैचारिक, साहित्यिक, संगीत आणि लोककलेची मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे.

शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी १०.४५ वाजता चिंचवड स्टेशन येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे.

या प्रबोधन पर्वासाठी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत

तसेच उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटनेते कुणाल वाव्हळकर, विविध समित्यांचे सभापती, सर्व प्रभाग अध्यक्ष, नगरसदस्य, नगरसदस्या, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या प्रबोधन पर्वात राज्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, अभ्यासक, व्याख्याते, साहित्यिक आणि कलाकार सहभागी होणार आहेत. प्रबोधनात्मक गीतगायन, देशभक्तिपर गीते, शाहिरी सादरीकरण आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमधून लहुजी वस्ताद साळवे यांचे विचार, सामाजिक समता आणि लोकसंस्कृतीचा वारसा उलगडला जाणार आहे.

See also  उपवर्गीकरणासाठी पिंपरी-चिंचवड दणाणले!

सर्व नागरिकांसाठी हा महोत्सव खुला आणि विनामूल्य असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विचार प्रबोधन पर्वाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

तीन दिवसांचे कार्यक्रम

शनिवार, १४ नोव्हेंबर २०२६

सकाळी ९ ते ११ : प्रबोधनात्मक गीतगायन – निलेश देवकुळे

सकाळी १०.३० : उद्घाटन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण

सकाळी १०.४५ : चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास अभिवादन

सकाळी ११ ते दुपारी १ : लेखणीचा बादशहा – बापू पवार

सायंकाळी ५ ते ७ : प्रबोधनात्मक गीतगायन – अनिकेत जवळेकर

सायंकाळी ७ ते रात्री १० : देशभक्तिपर गीते, अभिमान महाराष्ट्राचा – शाहीर शैलेश लोखंडे

रविवार, १५ नोव्हेंबर २०२६

दुपारी ३ ते सायंकाळी ५ : प्रबोधनात्मक गीतगायन – निवास चव्हाण

सायंकाळी ५ ते ७ : प्रबोधनात्मक गीतगायन – रणजीत खंडागळे

सायंकाळी ७ ते रात्री १० : प्रबोधनात्मक देशभक्तिपर गीते – शिल्पा पांचाळ (भवार)

सोमवार, १६ नोव्हेंबर २०२६

दुपारी ३ ते सायंकाळी ७ : प्रबोधनात्मक गीतगायन – अजय क्षीरसागर

सायंकाळी ५ ते ७ : गाथा शूरवीरांची, देशभक्तिपर गीते – स्नेहल नाईकवाडी व सहकलाकार

सायंकाळी ७ ते रात्री १० : स्वरचंदन – चंदन कांबळे

  • Related Posts

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केले आकाशकंदील अन् रंगविले दिवे; विक्रीतून मिळालेला निधी अनाथाश्रम आणि दिव्यांग संस्थेला भेट काशिनाथ शिंदे Read moreSPPU मधील सहाय्यक कुलसचिवाला धमकी प्रकरणी गुन्हा दाखलपिंपरी पुणे: शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये…

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    हाजीमलंग मारीमुत्तू यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कमिटीचा उपक्रम; मान्यवरांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नदेहूरोड: देहूरोड शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    अनाथाश्रमातील मुलांसोबत पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी; ‘दीपोत्सव’ उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश!

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    देहूरोडमध्ये पंडित नेहरू जयंती व बालदिन उत्साहात साजरा; बालकांना खाऊवाटप

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन!

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    नेहरू जयंतीनिमित्त महापालिकेतर्फे अभिवादन; उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा थरार! ३० व्या आयएमएफ वेस्ट झोन स्पोर्ट क्लायम्बिंग चॅम्पियनशिपचे दिमाखात उद्घाटन

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या

    मेव्हण्याचा राग रक्तरंजित! नागपूरच्या मेडिकल चौकात पलाश वासनिकची निर्घृण हत्या