क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण

काशिनाथ शिंदे

पिंपरी : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरोधात सशस्त्र उठाव करून ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारे थोर आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर आणि विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी नगरसदस्य कृष्णा सुरकुले, माजी नगरसदस्या उषा मुंढे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वाहनचालक संतोष खामकर, विद्युत विभागाचे विष्णू गवारे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग परचंडराव, दत्तात्रय कोकाटे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमहापौर शर्मिला बाबर म्हणाल्या की, लहानपणापासूनच देशभक्तीची प्रेरणा असलेल्या बिरसा मुंडा यांनी इंग्रजांच्या अन्यायकारक सत्तेविरोधात बंड पुकारले. हजारो क्रांतिकारकांना संघटित करून पारंपरिक धनुष्यबाण आणि तीर-कमठ्यांच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशांविरोधात लढा उभारला. त्यांचा हा संघर्ष भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदविण्यासारखा आहे. त्यांच्या प्रखर देशभक्तीचा, धैर्याचा आणि संघर्षशील वृत्तीचा आदर्श भावी पिढीने घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

See also  बार्शीत पोलिसांचा दणका! गुटखा-दारूचा साठा जप्त; तिघांविरुद्ध कारवाई
  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक