मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

काशिनाथ शिंदे

पुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली पदार्थविरोधी पथक क्रमांक २ ने धडक कारवाई करत मॅफेड्रॉन (एमडी) विक्रीच्या संशयावरून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ९२ हजार ६०० रुपये किमतीचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त करण्यात आले. तसेच मोबाइल फोन, रिक्षा आणि रोख रकमेसह एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने आणि सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांचे पथक मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. यावेळी उत्सव समिती चौकातून गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यावर, वारणा सहकारी बँकेच्या इमारतीलगत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर काळ्या-पिवळ्या रंगाच्या रिक्षामध्ये तिघे संशयास्पदरीत्या बसलेले आढळले.

पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेऊन दोन पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन आढळून आले.

सुभाषगौडा गुरता चौधरी (वय ३२), बाप्पू भीमा बाळशंकर (वय २८) आणि शाहरुख मेहबूब खान (वय २८), अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही मार्केटयार्ड येथील आंबेडकरनगर परिसरातील रहिवासी आहेत.

या कारवाईत मॅफेड्रॉनसह मोबाइल फोन, बजाज रिक्षा आणि रोख रक्कम असा एकूण ७ लाख ५ हजार ४२९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त (गुन्हे) गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-३) शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक जीवन माने, सहायक पोलीस निरीक्षक अफरोज पठाण यांच्यासह अमोल जगताप, सतीश चव्हाण, शरद धांडे, संदीप देवकाते, योगेश मांढरे, योगेश कुंभार, सुरेखा साबळे, जानवी सूर्यवंशी, सुकेशिनी आंबले आणि अजिंक्य जोजारे यांनी सहभाग घेतला.

See also  ज्येष्ठ नागरिकांच्या न्यायहक्कासाठी आता कायदेशीर बळ! अॅड. रमेश संभाजीराव उमरगे यांची समता ज्येष्ठ नागरिक संघाच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती
  • Related Posts

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    पद्मश्री दादा इधाते यांचे प्रतिपादन; चिंचवडमध्ये तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी: क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक