शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

मदत व पुनर्वसन विभागाचे आवाहन; अडचणी सोडविण्यास राज्य शासन तत्पर

काशिनाथ शिंदे

मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी तसेच अन्य शासकीय योजनांचा लाभ विनाअडथळा मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून फार्मर आयडी तयार करून घ्यावा, असे आवाहन राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. विशेषतः दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला प्राधान्य द्यावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य, अनुदान आणि अन्य लाभ दिले जातात. हे लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत थेट आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रणालीतील माहिती अद्ययावत असणे आवश्यक आहे. त्यामुळे ई-केवायसी आणि फार्मर आयडीची नोंदणी पूर्ण करणे महत्त्वाचे ठरत आहे.

दरम्यान, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रीम मदत देण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे महत्त्व अधिक वाढले आहे. पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा होण्यासाठी आवश्यक नोंदणी आणि पडताळणी पूर्ण असणे गरजेचे आहे.

ॲग्रीस्टॅक प्रणालीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून अद्ययावत ठेवण्यात येत आहे. या माहितीच्या आधारे विविध शासकीय योजनांचा लाभ देणे अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही कारणास्तव ई-केवायसी किंवा फार्मर आयडीची प्रक्रिया अपूर्ण ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

अडचणी आल्यास शासन करणार सहकार्य

ई-केवायसी किंवा फार्मर आयडी तयार करताना तांत्रिक अथवा अन्य अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडविण्यासाठी राज्य शासन आवश्यक सहकार्य करणार आहे. त्यामुळे अडचणींमुळे प्रक्रिया थांबविण्याऐवजी संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून माहिती अद्ययावत करावी आणि पडताळणी पूर्ण करून घ्यावी.

फार्मर आयडी तयार करण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या सीएससी (नागरी सुविधा केंद्रात) आधार कार्ड आणि आधारशी संलग्न असलेला मोबाईल क्रमांक घेऊन जावे. शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळविण्यासाठी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन मदत व पुनर्वसन विभागाने केले आहे.

See also  महावितरणची ‘अभय योजना २०२६-२७’ उद्यापासून लागू; थकबाकीदारांना मोठा दिलासा!
  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक