“सुनेत्रा पवारांवरील विधानावरून राष्ट्रवादी आक्रमक; हर्षवर्धन सपकाळांनी जाहीर माफी मागावी”

काशिनाथ शिंदे : पिंपरी

पिंपरी : महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने बुधवारी आंदोलन केले. शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरील संबंधित पोस्ट तातडीने हटवून हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना योगेश बहल म्हणाले की, वैयक्तिक दुःखावर मात करून सुनेत्रा पवार राज्याच्या विकासासाठी सक्रियपणे कार्य करत आहेत. अशा महिला नेत्या संदर्भात काँग्रेसकडून वापरण्यात आलेली भाषा ही केवळ त्यांचाच नव्हे, तर राज्यातील प्रत्येक कर्तृत्ववान महिलेचा अपमान आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र महिलांचा अवमान करणारी भाषा महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला शोभणारी नाही. त्यामुळे काँग्रेसने या प्रकरणी जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली.

या आंदोलनात विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, विठ्ठल (नाना) काटे, सीमा सावळे, वैशाली घोडेकर, कविता आल्हाट, राहुल भोसले, फजल शेख, शाम लांडे, सारंग कामतेकर, शेखर काटे, वर्षा जगताप, वैशाली काळभोर, स्वाती (माई) काटे, माया बारणे, अरुणा लंगोटे, प्रतीक्षा लांगी जवळकर, निकिता कदम, दीप्ती कांबळे, उज्वला ढोरे, योगिता बारणे, शमीम पठाण, प्रियांका कुदळे, पंकज भालेकर, राजेंद्र जगताप, जितेंद्र ननावरे, विराज लांडे, शेखर चिंचवडे, प्रमोद कुटे, सागर कोकणे, राजू बनसोडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे : नंदकुमार सातुर्डेकर
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!