भुगावमध्ये हॉटेलच्या आड गांजाची विक्री?; १.९९२ किलो गांजा जप्त, दोघांवर गुन्हा

काशिनाथ शिंदे : भूगाव बावधान

भुगाव येथील अमन होंडा समोरील पद्मावती हॉटेल परिसरात बावधन पोलिसांनी कारवाई करत हॉटेल चालकाकडून तब्बल १ किलो ९९२ ग्रॅम गांजा जप्त केला. जप्त गांजाची अंदाजे किंमत १ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गांजा विक्रीसाठी दिल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गोपाळ शेट्टी (वय ३८, रा. शेडगेवाडा, भुगाव, ता. मुळशी) हा हॉटेल व्यवसाय करतो. त्याच्याकडे बेकायदेशीररीत्या गांजा बाळगल्याचे आढळून आले. तो गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

दरम्यान, कृष्णा साखरे (रा. मुंडेवस्ती, बावधन, पुणे) याने विक्रीसाठी हा गांजा रुपेश शेट्टी याला दिल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे दोघांविरुद्ध एनडीपीएस अॅक्ट कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रुपेश शेट्टी याला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई १० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास पद्मावती हॉटेल परिसरात करण्यात आली. त्यानंतर रात्री ९.५७ वाजता बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल गिरी करीत आहेत. गांजा नेमका कुठून आणण्यात आला, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि गांजाची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास पोलीस करीत आहेत.

See also  जेवणानंतर काही वेळातच पोलीस अधिकाऱ्याचा दुर्दैवी अंत; नागपूर पोलीस दलात खळबळ
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!