सुरूरमध्ये रात्रगस्तीवरील पोलिसांवर प्राणघातक हल्ला; कॉन्स्टेबल गंभीर जखमी

काशिनाथ शिंदे : सातारा

भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरूर (ता. वाई) येथील बाजार तळावर रात्रगस्तीवर असलेल्या पोलीस पथकावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. १०) मध्यरात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल किरण निंबाळकर गंभीर जखमी झाले असून, प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरूर येथील बाजार तळाच्या परिसरात काही संशयास्पद व्यक्ती थांबल्या असल्याची माहिती रात्रगस्तीवरील पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सूरज शिंदे, कॉन्स्टेबल किरण निंबाळकर, सतीश कदम आणि होमगार्ड यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी परिसरातील व्यक्तींकडे चौकशी केली असता, फलटण येथील काही जण त्यांना मारण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर परिस्थितीची पाहणी सुरू असतानाच काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात कॉन्स्टेबल किरण निंबाळकर गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर भुईंज पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, सहभागी आरोपींची संख्या आणि त्यांची भूमिका याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. फरार संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथकांच्या माध्यमातून तपास सुरू आहे.

रात्रगस्तीवरील पोलिसांवरच थेट प्राणघातक हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

See also  चार पोलिस अधिकारी-अंमलदार सेवानिवृत्त; सेवागौरव सोहळ्यात भावपूर्ण निरोप
  • Related Posts

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील दिवसभराची धावपळ, बातम्यांच्या मागे सुरू असलेली सततची लगबग आणि क्षणाक्षणाला बदलणाऱ्या घडामोडी… या सगळ्यात वेळ कधी निघून जातो, हे कळतही नाही. मात्र बैलपोळा आला…

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    महावितरणचा हायटेक सर्जिकल स्ट्राईक; तीन महिन्यांत २७ हजार ९६४ वीजचोऱ्या उघड काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नमुंबई : वीजचोरीला आळा घालण्यासाठी महावितरणने आता आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    अमोल डंबाळे यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    अमोल  डंबाळे  यांची बैलपोळ्याच्या निमित्ताने गावच्या मातीशी भावनिक नाळ; पुण्याच्या धावपळीतही मराठवाड्याची ओढ कायम!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    ‘एआय’च्या नजरेतून वीजचोरांचा पर्दाफाश!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    काँक्रीटमधील नवकल्पनांतून शाश्वत भारताची उभारणी!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    मातंग समाजाच्या हक्कांसाठी आता दिपाली केंगारे यांची ‘शहराध्यक्ष’ म्हणून धुरा!

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा अविरत लढा! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!

    दहीहंडीतील नियमभंगावर देहूरोड पोलिसांचा दणका!